-
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
नवग्रहामध्ये ग्रहांचा राजकुमार मानल्या जाणारा बुध ग्रहाने २९ ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला असून १७ नोव्हेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्यदेखील या राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यामुळे वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि बुधाची युती निर्माण होईल. या युतीमुळे‘बुधादित्य योग’ निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोगाला खूप खास मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या युतीमुळे काही राशीच्या व्यक्तींना फायदा होईल. त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीत निर्माण होणाऱ्या बुधादित्य राजयोगाच्या प्रभावाने तूळ राशीच्या खूप फायदा होईल. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. या राशीच्या व्यक्तींसाठीही बुधादित्य योग उत्तम सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींनाही वृश्चिक राशीत निर्माण होणाऱ्या बुधादित्य राजयोगाच्या प्रभावाने अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींनाही वृश्चिक राशीतील बुधादित्य राजयोगाच्या प्रभावाने आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये होतील. मार्केटिंग, मीडिया, बँक व शिक्षण या क्षेत्रांतील व्यक्तींना यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा