-
आहारासाठी निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे फळे. फळे पोषक, प्रोटेक्शन अशा विविध प्रकारचे आवश्यक पोषक घटक शरीराला देत असतात. आपण जे फळं रोज खातो, ते प्रत्येक फळ आपल्या शरीराला विशिष्ट पोषण देतात, ज्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरतात. पण, जेव्हा आपण विचार करतो की, कोणत्या फळात विशिष्ट पोषणतत्त्वांचे सर्वाधिक प्रमाण आहे, तेव्हा मात्र आपण सगळेच विचारात पडतो. (फोटो सौजन्य : @freepik)
-
अलीकडेच एका इन्स्टाग्राम पोस्टने विविध पोषक घटक असणाऱ्या फळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ॲव्होकॅडो सर्वात चरबीयुक्त फळ, साखरेसाठी खजूर, प्रथिनेसाठी पेरू, फायबरसाठी रास्पबेरी आणि अँटिऑक्सिडंट्ससाठी डाळिंब. किवीमध्ये व्हिटॅमिन सीचा स्त्रोत, व्हिटॅमिन एसाठी आंबा आणि पोटॅशियम पॉवरहाऊस म्हणून केळी या सर्व गोष्टी या यादीत हायलाईट केल्या आहेत. (फोटो सौजन्य : @freepik)
-
तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा यांच्याशी चर्चा केली. आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा यांनी या दाव्यांची तपासणी केली आणि आपल्या आहारात समाविष्ट केलेल्या आणि विविध पोषक घटकांच्या अतिरिक्त फायद्यांबद्दल माहिती दिली. त्यांच्या मते, यातील काही दावे खरे असले तरी कमी ओळखली जाणारी फळंदेखील तितकीच पोषणतत्त्वांनी परिपूर्ण असतात.(फोटो सौजन्य : @freepik)
-
अनुश्री शर्मा म्हणतात की, भारतात आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) द्वारे प्रदान केलेल्या आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतो. तर मार्गदर्शक तत्त्वांनुसार माहिती पुढीलप्रमाणे… (फोटो सौजन्य : @freepik)
-
फॅट्स : बहुतेक फळांमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते. पण, ॲव्होकॅडो हे अपवाद आहेत, कारण यात चरबीचे प्रमाण जास्त असते. २. साखर : इतर फळांच्या तुलनेत खजुरामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. (फोटो सौजन्य : @freepik)
-
प्रथिने : फळांमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते. पण, पेरू हे फळ या सगळ्यांमध्ये वेगळे ठरते (Nutrient Rich Fruits). कारण इतर फळांच्या तुलनेने यात जास्त प्रथिने असतात. ४. फायबर : सपोटा (Sapota) आणि पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे, जे आहारातील गरजा पूर्ण करण्यासाठी एक चांगला स्त्रोत ठरतात. (फोटो सौजन्य: @freepik)
-
अँटिऑक्सिडंट्स : जास्तीत जास्त फळं अँटीऑक्सिडन्ट्सने परिपूर्ण असतात, पण प्रत्येक फळात त्याचे प्रमाण आणि प्रकार वेगवेगळे असतात. अँटीऑक्सिडन्ट्स आपल्या शरीराला हानिकारक पदार्थांपासून संरक्षण देतात. व्हिटॅमिन सी : किवी हे व्हिटॅमिन सी कंटेंटसाठी ओळखले जाते. पण, आवळा, पेरू, कस्टर्ड, सफरचंद यांसारख्या भारतीय फळांमध्ये याचे प्रमाण खरोखरच जास्त असते. (फोटो सौजन्य : @freepik)
-
७. व्हिटॅमिन ए : पपई, अॅप्रिकोट, टरबूज यांप्रमाणेच आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त असते. (फोटो सौजन्य : @freepik)
-
८. पोटॅशियम : केळी हे पोटॅशियमने भरपूर आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे एकमेव फळ आहे. पण, द्राक्षे, पेरू, डाळिंबातही पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. (फोटो सौजन्य : @freepik)

Donald Trump : “जर युक्रेनबरोबरचं युद्ध थांबवलं नाही तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी? ५० दिवसांचा दिला अल्टिमेटम