-
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने १२ राशीच्या व्यक्तींवर शुभ किंवा अशुभ परिणाम पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, शुक्र २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांपासून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र या राशीत २८ डिसेंबरपर्यंत राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यानंतर तो कुंभ राशीत प्रवेश करेल. शुक्र ग्रहाचे मकर राशीतील राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशींच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. कन्या राशीमध्ये शुक्र पाचव्या घरात गोचर करणार आहे. या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. आई-वडीलांची पुरेपुर साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे राशी परिवर्तन कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. शुक्र ग्रहासह तुमच्यावर शनीचीही कृपा असेल. त्यामुळे भाग्याची पुरेपुर साथ तुम्हाला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया