-
चांगले केस आणि त्वचा कोणाला नको असते? तर याचबाबतची माहिती पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाने गुंजन तनेजाबरोबर झालेल्या पॉडकास्टमध्ये दिली. सोनम बाजवा म्हणाली, “आनुवंशिकदृष्ट्या चांगले केस आणि त्वचेचा आशीर्वाद तिला मिळाला आहे. पण, सांगायचे झाल्यास आवळा हे असं एक फळ आहे, ज्याचा मी बऱ्याच काळापासून विविध रूपांत उपयोग करते आहे. जर आवळ्याचा रस पिणे शक्य नसेल, तर मी ते फळ इतर कोणत्याही स्वरूपात खाते. पण, जर मला शक्य असेल, तर रोज आवळ्याचा रस पिणे मी पसंत करते.” (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम / @freepik / @sonambajwa)
-
आवळ्याचे फायदे समजून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबईच्या झिनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांच्याशी चर्चा केली. आवळ्याचे भारतात मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. कारण- त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
आवळा, ज्याला भारतीय गुसबेरी म्हणतात. हे लहान फळ हिरव्या रंगाचे दिसते. आवळा व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर व खनिजे यांसारख्या आवश्यक पोषक घटकांनी समृद्धसुद्धा आहे. कच्चा आवळा, आवळा ज्यूस, आवळा पावडर, आवळा कँडी ते आवळा तेल अ आवळ्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
आवळा खायला अनेकांना आवडतो. कारण- तो आंबट आणि किंचित कडू असतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅस व अपचनाचा त्रास असलेल्या लोकांनी आवळा खाण्याचा प्रयत्न करावा, असे जिनल पटेल म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
आवळ्यातील प्रथिने भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात : जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ पीएस सुषमा यांनी सांगितले की, आवळ्याच्या नियमित सेवनाने इन्फेक्शन, तसेच सर्दी आणि इतर आजारांपासूनही चांगले संरक्षण मिळू शकते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
आवळ्यातील प्रथिने भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात आणि त्यामुळे वजन व्यवस्थापनासाठी आवळा एक उत्तम उपाय ठरू शकतो. आरोग्यदायी खाण्याच्या सवयींमध्ये भूक कमी करण्यासाठी आवळा योगदान देऊ शकतो, असे सुषमा म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
आवळ्याच्या इतर आरोग्यदायी फायद्यांमध्ये त्वचेचे चांगले आरोग्य, केस मजबूत करणे आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे या गोष्टींचा समावेश असू शकतो. आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स, सी रॅडिकल्सशी लढून आणि कोलेजन उत्पादनास समर्थन देऊन निरोगी त्वचेसाठी योगदान देतात. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने नैसर्गिक तेज आणि त्वचेचा टेक्श्चर सुधारण्यास मदत मिळू शकते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे? मात्र, आवळा जास्त खाणे शरीरासाठी हानिकारकसुद्धा ठरू शकते. पोटात पेटके, गॅस, गोळा येणे किंवा ॲलर्जी यांसारख्या अनेक प्रकारच्या समस्यांचा अनुभव येऊ शकतो. तुमच्या नियमित आहारात नवीन गोष्टी किंवा पदार्थांचा समावेश करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
निर्णय घेण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला फायदे आणि साइड इफेक्ट्स सांगण्यात आणखीन मदत करू शकतात. लक्षात ठेवा, संयम महत्त्वाचा आहे, असे जिनल पटेल म्हणाल्या आहेत.(फोटो सौजन्य : @Freepik)

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल