-
प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाचे नाव अद्वितीय; पण आधुनिक हवे, असे नेहमीच वाटत असते.
-
जर तुमच्या घरात या डिसेंबरमध्ये नवा पाहुणा घरी आला असेल, तर ही आधुनिक नावे नक्की पाहा.
-
आरव- डिसेंबरमध्ये जन्मलेल्या बाळाचे नाव आरव ठेवू शकता. आरव हे महादेवाचे एक नाव असल्याचे मानले जाते.
-
वियान- सध्या आधुनिक असे नाव म्हणजे वियान. या नावाचा अर्थ म्हणजे एक कलाकार किंवा विशेष ज्ञान असणारा.
-
रिधान- हिवाळ्यात आगमन झालेल्या या लहानशा जीवाचे नाव तुम्ही रिधान ठेवू शकता. या नावाचा अर्थ ‘शोध लावणारा’, असा आहे.
-
गौरांग- विष्णू, श्रीकृष्ण व महादेव या देवांना गौरांग, असेही म्हटले जाते. त्यामुळे तुमच्या बाळाचे नाव ठेवणाऱ्या पर्यायांमध्ये गौरांग या नावाचा एक उत्तम पर्याय जोडला जाऊ शकतो.
-
रेयांश – सूर्याच्या पहिल्या किरणला रेयांश, असे म्हणतात. तुमच्या या कोवळ्या जीवासाठी हे नाव एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
-
शर्विल – श्रीकृष्णाला शर्विल, असे म्हटले जाते. त्यामुळे हे नाव तुमच्या बाळासाठी आधुनिक आणि अनोखे नाव ठरेल.
-
ईशान- हे नाव महादेवाला म्हटले जाणारे एक नाव आहे. त्याचा अर्थ सूर्य आणि अग्नी, असा आहे. पुढे जगाशी लढण्याचे बळ देणारे हे नाव तुमच्या मुलासाठी उत्तम पर्याय असू शकतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स )

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा