-
ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच या राशी परिवर्तनादरम्यान अनेकदा दोन ग्रह एकाच राशीत युती निर्माण करतात किंवा एकमेकांसमोर येतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या २७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी बुध आणि शनी एकमेकांपासून ९० अंशामध्ये स्थित असतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यामुळे समकोणीय किंवा केंद्र दृष्टि योग निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी-बुधाची केंद्र दृष्टी युती मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी-बुधाची केंद्र दृष्टी मकर राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीच्या व्यक्तींसाठी शनी-बुधाची केंद्र दृष्टी अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. मीन राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीपः वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वैष्णवी आत्महत्या प्रकरण: पुण्यातून राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना अटक