-
हिवाळ्यात (Winter Season) केस ओले राहिल्याने किंवा स्वेटर न घालता खुल्या हवेत गेल्याने सर्दी होते, असे सामान्यत: म्हटले जाते. पण, ते संपूर्ण सत्य नाही.
-
वास्तविकता अधिक गुंतागुंतीची आहे. खरे म्हणजे वातावरणातील थंड हवामानामुळे सर्दी आणि फ्लूसारख्या श्वसन विषाणूंना पकडणे सोपे होते.
-
त्यामुळे थोडी काळजी घेतल्यास यापासून दूर राहता येते.
-
केवळ हिवाळ्यातील थंड हवेमुळे ही समस्या निर्माण होते असे नाही.
-
याव्यतिरिक्त कोरड्या हवेमुळेही फ्लूचा प्रादुर्भाव होतो. आणि हिवाळ्यातील कोरडी हवा इन्फ्लूएंझा विषाणूला जास्त काळ संसर्गजन्य राहण्यास मदत करते.
-
थंड हवेचा श्वास घेतल्याने श्वसनमार्गातील रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे विषाणूंना पकडणे सोपे होते.
-
नाकावर आणि तोंडावर स्कार्फ बांधल्याने सर्दी टाळण्यास मदत होते.
-
स्कार्फ बांधल्याने श्वास घेत असलेली हवा गरम होऊन आत घेतली जाते. म्हणूनच मुख्य गोष्ट अशी आहे, की केवळ ओले आणि थंड असण्याने आजारी पडत नाही.
-
यावर उपाय म्हणून आपले हात वारंवार धुवा, चेहऱ्याला सतत स्पर्श करणे टाळा, दिवसाला आठ ग्लास पाणी पिणे चांगले.
-
परंतु जीवनशैली आणि व्यक्तीच्या आकारानुसार ते कमी-अधिक असू शकते.
-
संतुलित आहार घ्या, हिवाळ्यातही शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा, पुरेशी झोप घ्या, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels) हेही पाहा : झोपेत घोरण्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो का? शास्त्रज्ञांच्या मते…

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल