-
महिलांना नेहमीच तयार व्हायला खूप वेळ लागतो म्हणून सारखे टोमणे मारले जातात. जास्त मेकअपसुद्धा शरीरासाठी योग्य नाही.
-
उत्तम मेकअपने नैसर्गिक सौंदर्य जपून ठेवायचे आहे? मग ही प्रक्रिया नक्की फॉलो करा
-
सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून त्यावर एक मॉइश्चरायझर लावा, यामुळे त्वचेचे नैसर्गिक रूप कायम राहते.
-
यानंतर तुमच्या त्वचेच्या रंगाला मॅच होईल अशी बीबी क्रीम लावा, यामुळे संपूर्ण चेहरा एकसारखा दिसण्यास मदत होईल.
-
डोळ्याखालची काळी वर्तुळे मिटविण्यासाठी कन्सीलरचा वापर करणे फायद्याचे ठरेल. कन्सीलर लावताना ब्रश किंवा हाताच्या बोटांचा वापर करावा.
-
यानंतर लूज पावडर लावून मेकअप सेट करावा. ही पावडर लावण्यासाठी मोठ्या ब्रशचा वापर करावा, ज्यामुळे पावडर सर्व ठिकाणी योग्यरित्या पसरेल.
-
यानंतर तुमच्या लूकला शोभून दिसेल असे आयशॅडो डोळ्यांवर लावावे. आयशॅडो लावताना आपल्या स्किनटोनकडे लक्ष असणे आवश्यक आहे.
-
डोळ्यांच्या पापण्यांना हलका मस्कारा लावून दोन्हीकडच्या पापण्या एकसमान कराव्यात.
-
हा लूक पूर्णत्वाला आणण्यासाठी शेवटची गोष्ट म्हणजे लिपस्टिक किंवा लीप ग्लॉस. आपल्या लूकला शोभून दिसेल अशी लिपस्टिक किंवा लीप ग्लॉस लावणे फायद्याचे ठरेल.
(सर्व फोटोसौजन्य : पेक्सएल्स)