-
हिंदू पंचागनुसार, या वर्षी अक्षय्य तृतीयाचा सण ३० एप्रिल रोजी साजरा होणार आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास ते कार्य यशस्वी संपूर्ण होते असे म्हटले जाते. (Photo : Loksatta)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयाला ८२ वर्षानंतर अद्भूत संयोग निर्माण होणार आहे. जाणून घेऊ या हा अद्भूत संयोग कोणत्या पाच राशींसाठी खास असणार आहे. (Photo : Loksatta)
-
अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सर्वार्थसिद्धी योग, शोभन योग आणि रवि योगचा शुभ संयोग निर्माण होणार आहे. (Photo : Loksatta)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, हे अद्भूत संयोग ५ राशींसाठी जबरदस्त लाभ देऊ शकतात. जाणून घेऊ या पाच राशींचे नशीब अचानक बदलू शकते. (Photo : Loksatta)
-
वृषभ राशी
आर्थिक आणि कौटुंबिक प्रकरणात विशेष लाभ मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसायात यश मिळू शकते. गुंतवणूकीसाठी उत्तम वेळ आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना शुभ वार्ता ऐकायला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन काम मिळेल. पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. (Photo : Loksatta) -
कर्क राशी
नवी नोकरीशी संबंधित प्रयत्न यशस्वी होतील. अचानक अडकलेले धन संपत्ती परत मिळेल. सोने चांदीचे दागिने खरेदी करू शकतील. प्रवासातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय उत्तम राहीन. (Photo : Loksatta) -
तुळ राशी
या लोकांना अचानक कमावण्याचे नवीन स्त्रोत निर्माण होईल. घर किंवा वाहन खरेदी करण्याचे योग दिसून येईल. धन संपत्ती वाचवू शकता. व्यवसायात आकस्मिक धन लाभ होईल. तुळ राशीच्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेन. (Photo : Loksatta) -
मकर राशी
नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. जर तुमचे काम दीर्घ काळापासून अडकलेले असेल तर त्यात प्रगती होईल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. कष्टाचे फळ मिळेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. (Photo : Loksatta) -
कुंभ राशी
घरातील कोणत्याही सदस्यापासून आर्थिक मदत मिळू शकते. व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो. पितृक संपत्तीमध्ये लाभ होईल. दैनंदिन पगारात वाढ होईल. या लोकांचे आयुष्य बदलणार. धनसंपत्ती मध्ये वृद्धी होईल. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहीन. (Photo : Loksatta)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”