-
संध्याकाळचा नाश्ता असो किंवा सकाळचा नाश्ता, जेव्हा तो निरोगी आणि चविष्ट असते तर खायची मज्जा आणखी वाढते. तुमचा नाश्ता निरोगी आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी, एक खास रेसिपी आहे, ती म्हणजे दही कबाबची रेसिपी! यामुळे नाश्त्याची मजा द्विगुणीत होईल. दह्यापासून बनवलेले हे कुरकुरीत आणि मसालेदार कबाब सर्वांना आवडतील आणि सर्वजण तुमची प्रशंसा करतील. कुरकुरीत आणि मसालेदार दही कबाब बनवण्याची सोपी रेसिपी येथे जाणून घ्या.
-
साहित्य : २ कप दही, १ कप पनीर (किसलेले), १/२ कप बेसन, १ छोटा कांदा (चिरलेला), २ चमचे आले, लसूण पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा लाल तिखट, १ चमचा हळद, १ चमचा जिरेपूड, १/२ कप ब्रेडचा चुरा चवीनुसार मीठ, मूठभर धणे
-
दही कबाब रेसिपी : दही कबाब बनवण्यासाठी, प्रथम एका मोठ्या भांड्यात दही घाला. नंतर त्यात किसलेले पनीर, कांदा, बेसन, लाल तिखट, गरम मसाला, हळद, आले-लसूण पेस्ट, जिरे पावडर आणि मीठ घाला. यानंतर, सर्व साहित्य चांगले मिसळून घट्ट मिश्रण तयार करा.
-
दही कबाब रेसिपी : आता या मिश्रणापासून छोटे कबाब बनवा. एका प्लेटवर ब्रेडचा चुरा पसरवा आणि तयार केलेले कबाब ब्रेडचा चुरा चांगले बुडवा. हे कबाब बटर पेपरने झाकलेल्या बेकिंग ट्रेवर ठेवा आणि १८० अंश सेल्सिअसवर सुमारे ३० मिनिटे सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत बेक करा.
-
दहीन कबाब रेसिपी : तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते तेलात तळू शकता. चविष्ट आणि मसालेदार दही कबाब तयार आहे. तुमच्या आवडत्या चटणीबरोबर गरमागरम दही कबाब सर्व्ह करा आणि आस्वाद घ्या.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा