-
जगात असे अनेक देश आहेत जिथे अर्थव्यवस्थेचा मोठा भाग हा पर्यटनातून येतो. मालदीव, स्पेन, इटली, सौदी अरेबिया असे अनेक देश आहेत ज्यांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहेत. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
पर्यटनस्थळ निवडण्याबाबतही पर्यटकांची वेगवेगळी कारणे असतात. काही लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जायला आवडते तर काहींना शांतता आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हिल स्टेशनवर जाणे आवडते. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
असेही बरेच लोक आहेत ज्यांना एकटे प्रवास करायला आवडते. पण आजकाल डार्क टुरिझमची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. हे नेमकं काय आहे ते आपण आज जाणून घेणार? (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
एका अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत लोकांचा डार्क टुरिझममध्ये रस वाढला आहे. विशेषतः अमेरिकन लोक सुंदर दऱ्या आणि समुद्रकिनारे सोडून अशा ठिकाणी जात आहेत जिथे ते डार्क टुरिझमचा आनंद घेऊ शकतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
डार्क टुरिझम म्हणजे काय?
डार्क टुरिझम म्हणजे अशी जागा जिथे गोष्टी अस्ताव्यस्त स्वरूपात असतात किंवा सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तेथे अवशेष पाहायला लोक येतात. लोकांना अशा ठिकाणी जायला आवडते जिथे एखाद्या दुखःद घटनेच्या खुणा असतात. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
डार्क टुरिझम करणारे लोक युद्धक्षेत्रे, आपत्तीग्रस्त क्षेत्रे, जुन्या इमारती, किल्ले आणि अशाच पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या स्थळांना भेट देतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
या ठिकाणी लोकांना युद्धाच्या खुणा, मोठ्या आपत्ती, दुःख आणि नरसंहाराच्या कथा पहायला आवडतात. डार्क टुरिझम पर्यटकांना अशा अवशेषांमध्ये राहून त्यांचे फोटो काढण्याचा आनंद मिळतो. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
अमेरिकेतील सुमारे ८० टक्के लोक आयुष्यात एकदा तरी डार्क टुरिझमचा आनंद घेतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
डार्क टुरिझमसाठी प्रसिद्ध ठिकाणे
जगातील ज्या ठिकाणी लोक डार्क पर्यटनासाठी जातातत्यामध्ये जपानमधील हिरोशिमा, कंबोडियातील तुओल स्लेंग नरसंहार संग्रहालय, युक्रेनमधील चेरनोबिल, न्यू यॉर्कमधील ग्राउंड जिरो, रवांडातील मुराम्बी नरसंहार स्मारक, पोलंडमधील ऑशविट्झ छळछावणी आणि लिथुआनियामधील KBZ मुख्यालय यांचा समावेश आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)
चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL