-
आचार्य चाणक्यांची चाणक्य नीती ही केवळ तत्त्वज्ञान नव्हे, तर आयुष्य जगण्याची शहाणीव देणारी मार्गदर्शक तत्वं आहेत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरं कसं जायचं, याचं स्पष्ट आणि तर्कशुद्ध उत्तर त्यामध्ये सापडतं. जर आपण चाणक्य नीतीत सांगितलेल्या शिकवणींना आपल्या रोजच्या जीवनात अमलात आणलं, तर अनेक समस्या आपोआप दूर होतील आणि जीवन अधिक सुखकर होईल. (फोटो: अनस्प्लॅश)
-
आचार्य चाणक्यांच्या मते, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर काही लोकांपासून नेहमीच अंतर ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः जेव्हा विषय पैशांशी संबंधित असतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
१. आचार्य चाणक्य स्पष्टपणे सांगतात की, ज्यांचे चारित्र्य डागाळलेले आहे, जे अनैतिक कृत्यांमध्ये गुंतलेले आहेत किंवा फसवणूक करणे हाच जणू त्यांचा स्वभावधर्म आहे, अशा लोकांपासून पैशांच्या बाबतीत नेहमी दूर राहावं. अशा व्यक्तींना पैसे उधार देणं म्हणजे स्वतःच्या संकटांना आमंत्रण देणं होय. त्यामुळे शहाणपण याच्यात आहे की, अशा लोकांची ओळख वेळेत करून सावध राहावं. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
अनैतिक कृत्यांमध्ये गुंतलेल्या लोकांना पैसे देणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देणे होय, कारण असे लोक ना पैशाचा योग्य उपयोग करतात, ना तो परत करण्याचा विचार करतात. (फोटो: अनस्प्लॅश)
-
२. चाणक्य नीतीनुसार, नेहमी असमाधानी राहणाऱ्या लोकांना पैसे देणे टाळावे, कारण अशा लोकांना कितीही दिलं तरी अपुरंच वाटतं आणि परत करताना नेहमी अडथळे निर्माण करतात. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
३. आचार्य चाणक्य सांगतात, ज्यांना ड्रग्जचे व्यसन आहे, अशा व्यक्तींना पैसे देणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणं होय. हे लोक पैसे स्वतःचं आयुष्य नष्ट करण्यासाठी वापरतात आणि त्याचबरोबर तुमचं आर्थिक व सामाजिक नुकसानही घडवतात. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
४. चाणक्य नीतीनुसार, मूर्ख आणि बेजबाबदार लोकांना पैसे देणं म्हणजे त्यांना उडवायला देणं होय. कारण असे लोक ना पैशाचं महत्त्व ओळखतात, ना त्याचा योग्य वापर करतात. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
५. चाणक्य नीतीनुसार, ज्यांना उधळपट्टीची सवय असते, ते नेहमीच आर्थिक अडचणीत राहतात. पैशांची उधळण न करता, योग्य वेळी बचत करणाऱ्यांनाच स्थैर्य आणि सुरक्षितता लाभते. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
६. आचार्य चाणक्य म्हणतात, पैशांबाबत अति कंजुषी करणारा माणूस कधीच मोठं यश मिळवू शकत नाही, कारण खरा आनंद आणि समृद्धी त्या व्यक्तीलाच मिळते, जो योग्य ठिकाणी चांगल्या कार्यासाठी मनापासून खर्च करतो. (फोटो: अनस्प्लॅश)

Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाचं लंडनला जाणारं २४२ प्रवासी असलेलं विमान अहमदाबाद एअरपोर्टजवळ कोसळलं