-    आठवड्याचे दोन ते तीन दिवस निघून गेले की, आता उद्या कोणती भाजी बनवू हा प्रश्न मनात येतोच. कधी पाऊस पडत असेल तर आपण मार्केटमध्ये जाऊन भाजी आणण्याचा कंटाळा येतो. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    तर कधी घरात भाजी नसली आणि तुमच्याकडे सांडगे असतील तर तुम्ही सांडग्यांची भाजी बनवू शकता. सांडगे बनवण्यासाठी तुरीची, मुगाची डाळ, हरभरा डाळ, वापरली जाते. सांडग्यांची भाजी पोळी किंवा भाकरी बरोबर खूप छान लागते. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    वाटीभर सांडगे घ्या आणि १ लहान चमचा तेल घेऊन त्यात सांडगे भाजून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    कढईत २ कांदे चिरून टाका. लालसर झाल्यानंतर मग १ टोमटो आणि चमचाभर आलं-लसूणीची पेस्ट टाका. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    तिखट, मसाला, मीठ , हळद आणि धन-जिरे पावडर त्यात टाका. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    त्यानंतर मग त्यात सांडगे आणि तुरीची डाळ टाकून व्यवस्थित हलवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    एक किंवा दोन ग्लास पाणी त्यात टाका. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    १५ ते २० मिनिटांत तुमची सांडग्यांची भाजी तयार. (फोटो सौजन्य: युट्युब / @SwatisKitchenn ) 
 
  साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  