-
दीपिका पादुकोण
अभिनेत्री दीपिका पादुकोण ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ती सतत काम करत आहे. -
फिटनेस कीन
एक चांगली अभिनेत्री असण्याबरोबरच ती आता आईही झाली आहे. तिला फिटनेस क्वीनही म्हटले जाते. तिच्यासारखी सडपातळ शरीरयष्टी आणि कर्वी फिगर हे अनेक मुलींचे स्वप्न असते. -
दीपिका काय खाते?
तिची फिगर मेंटेन करण्यासाठी दीपिका काय खाते? तिचा फिटनेस प्लॅन काय आहे ते जाणून घेऊयात. -
सकाळ
दीपिका रोज सकाळची सुरूवात मधाच्या पेयाने करते. ती मध आणि लिंबाचे कोमट पाणी पिते. यामुळे तिचे वजन नियंत्रणात राहते आणि तिचे शरीर सक्रिय राहते. -
नाश्ता
दीपिका नाश्त्यामध्ये इडली, साधा डोसा किंवा उपमा, २ बदाम, २ अंडी आणि १ कप दूध घेते. -
दुपारचे जेवण
दीपिकाच्या दुपारच्या जेवणात साधे जेवण असते. डाळ, भात, रोटी, भाज्या, दही, ज्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. -
स्नॅक्स
संध्याकाळच्या नाश्त्यात दीपिकाला नट्स, स्मूदी खाणे किंवा फिल्टर कॉफी पिणे आवडते. याशिवाय ती नारळ पाणी देखील पिते. -
रात्रीचे जेवण
दीपिकाचे रात्रीचे जेवण खूपच हलके असते. ती २ रोट्या, भाज्या आणि सॅलड खाते. त्यानंतर ती मिष्टान्न म्हणून डार्क चॉकलेट घेते. -
व्यायाम
निरोगी आहारासोबतच, दीपिका खूप व्यायाम देखील करते. तिचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती दररोज पिलेट्स आणि योगा करते. -
विविध अॅक्टिव्हिटी
फक्त वर्कआउटवर अवलंबून नाही, तर ती फिटनेससाठी धावणे, बॅडमिंटन खेळणे, पोहणे, नृत्य करणे, किकबॉक्सिंग अशा अॅक्टिव्हिटी करत राहते. (सर्व फोटो साभार- दीपिका पादुकोण इन्स्टाग्राम) हेही पाहा- स्मरणशक्ती सुधारायची आहे? मग आहारात ‘हे’ ८ पदार्थ नक्की समाविष्ट करा; म्हातारपणातही मेंदू राहील तीक्ष्ण

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक