-
बुध हा प्रेम, वैभव, बुद्धी व प्रगतीचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात बुध गोचराला विशेष महत्त्व आहे. आता बुध ग्रह १८ जुलैपासून कर्क राशीत वक्री होत आहे.
-
बुध १८ जुलैपासून ११ ऑगस्टपर्यंत वक्री अवस्थेत राहणार असून त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर होणार आहे. मात्र काही राशींना धन, प्रतिष्ठा आणि प्रगतीचा लाभ मिळणार आहे.
-
या काळात चार अशा राशी आहेत ज्यांच्यांसाठी प्रचंड लाभाचे योग तयार होत आहेत. या राशी कोणत्या व त्यांच्या भाग्यात कोणत्या मार्गाने बुध ग्रहाची कृपा दिसून येणार आहे हे पाहूया…
-
मिथुन राशीच्या मंडळींसाठी वक्री बुध अत्यंत शुभ परिणाम देऊ शकतात. अचानक आर्थिक लाभाचे योग निर्माण होऊ शकतात. घर, गाडी किंवा जमीन खरेदीसाठी योग्य काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी हे दिवस अत्यंत अनुकूल आहेत. व्यापाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात.
-
कन्या राशीसाठी हा काळ सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे. बुधदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल, कौटुंबिक सौख्य लाभेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक मधुर होतील. नोकरीत किंवा व्यवसायात यशाची प्राप्ती होऊ शकते.
-
बुधाची वक्री चाल तूळ राशींच्या लोकांसाठी शुभ परिणाम घेऊन येणारी ठरु शकते. तूळ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रमोशन किंवा पगारवाढीचे संकेत मिळतील. आत्मविश्वास वाढेल आणि कामात यश मिळेल. व्यापारामध्ये लाभाचे सौदे होऊ शकतात. या काळात अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो.
-
कुंभ राशीसाठी वक्री बुध आरोग्य, व्यवसाय आणि धन लाभाचे दार उघडणार आहे. मानसिक शांतता मिळेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळू शकेल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकेल.
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग