-
पावसाळ्यात पालकाचा रस : आरोग्यासाठी फायदेशीर
पावसाळ्यात दररोज पालकाचा रस प्यायल्याने शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात. व्हिटॅमिन्स, मिनरल्स व अँटीऑक्सिडंट्स यांचा समावेश असलेली पालक ही आरोग्यदायी भाजी आहे. मात्र, असा कोणताही आहारातील बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. -
रोगप्रतिकार शक्ती वाढते
पावसाळ्यात सर्दी-खोकला, ताप यांसारख्या आजारांचा धोका जास्त असतो. पालकातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स यांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि रोगांपासून बचाव होतो. -
रक्तदाब नियंत्रणात राहतो
पालकातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी पालकाचा रस उपयुक्त ठरतो. -
शरीराला ऊर्जा मिळते
पालक हा लोहाचा चांगला स्रोत आहे. लोहामुळे शरीरात लाल रक्तपेशी वाढतात, ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो आणि ऊर्जा वाढते. -
पचन सुधारते
पालकात भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यास ते फायदेशीर ठरते. -
डोळ्यांचं आरोग्य राखतो
पालकात ल्युटीन व झेक्सॅन्थिन हे घटक असतात, जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. हे घटक मोतीबिंदू आणि नजर कमकुवत होण्यासारख्या समस्यांपासून डोळ्यांचे संरक्षण करतात. -
हाडे आणि दात मजबूत करतो
पालकात व्हिटॅमिन K आणि कॅल्शियम मुबलक असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि दातांचे आरोग्य सुधारते. -
त्वचेला नैसर्गिक चमक देतो
पालकातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला ताजे आणि उजळ बनवतात. हे त्वचेचे नुकसान टाळतात आणि निरोगी चमक टिकवतात. -
वजन कमी करण्यास मदत
पालकात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

तरुणांमध्ये ‘या’ ३ कारणांमुळे झपाट्याने वाढतोय कॅन्सरचा धोका; जीवघेण्या सवयी आताच सोडा, नाही तर मोजावी लागेल मोठी किंमत