-
कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आहाराची भूमिका फार मोठी आहे. काही नैसर्गिक अन्नपदार्थ आपल्या रोजच्या जेवणात समाविष्ट केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि पेशींमध्ये होणारे घातक बदल रोखले जाऊ शकतात. चला जाणून घेऊया असे कोणते नऊ अन्नघटक आहेत, जे शरीराला कर्करोगविरोधी संरक्षण देतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
ब्रोकोली
हिरव्या रंगाची ही फुलासारखी भाजी ‘सल्फोराफेन’सारख्या शक्तिशाली घटकांनी समृद्ध असते. शरीरात अपायकारक पेशींची वाढ नियंत्रित करण्यात ही भाजी मदत करते. विशेषतः स्तन, फुप्फुस व आतड्यांच्या कर्करोगाविरोधात ही भाजी फायदेशीर ठरते. (फोटो सौजन्य : FreePik) -
बेरीज
ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी यांसारख्या लहान फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स व अँथोसायनिन्स ही संयुगे भरपूर असतात. ही फळं शरीरात सूज कमी करतात आणि पेशींचं नुकसान टाळण्याचं काम करतात. (फोटो सौजन्य : FreePik) -
गाजर
गाजर खाल्ल्यानं केवळ दृष्टीच सुधारत नाही, तर शरीरात अँटीऑक्सिडंट्सची पातळी वाढते. त्यामधील बीटा-कॅरोटीन कर्करोगाच्या शक्यतेला मर्यादा घालण्यास मदत करते; विशेषतः पचनसंस्थेशी संबंधित कर्करोगांमध्ये. (फोटो सौजन्य : FreePik) -
बदाम
दररोज मोजके बदाम खाल्ल्याने शरीरात आवश्यक पोषण मिळते. त्यातील फायबर्स, ‘गुड फॅट्स’ व व्हिटॅमिन ई शरीराच्या पेशींना संरक्षण देतात आणि स्तनांच्या कर्करोगाशी लढा देण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य : FreePik) -
हळद
हळदीत आढळणारा ‘कर्क्युमिन’ हा घटक शरीरातील दाह कमी करतो. या दाहविरोधी गुणधर्मांमुळे कर्करोग पसरू न देण्यामध्ये हळद उपयोगी पडते. अन्नात दररोज थोडी हळद वापरली तरी ती फायदेशीर ठरते. (फोटो सौजन्य : FreePik) -
टोमॅटो
टोमॅटोमधील ‘लायकोपीन’ नावाचा अँटीऑक्सिडंट प्रोस्टेट कर्करोगाशी संबंधित संशोधनांमध्ये प्रभावी सिद्ध झाला आहे. टोमॅटो रस, सूप किंवा कोशिंबीरमध्ये टोमॅटो समाविष्ट करा. (फोटो सौजन्य : FreePik) -
लसूण
लसणाच्या पाकळ्यांमध्ये नैसर्गिक सल्फरयुक्त संयुगे असतात, जी पेशींमध्ये बदल होण्याच्या प्रक्रियेला मर्यादित करतात. त्यामुळे शरीरात कर्करोगजन्य बदलांपासून बचाव होतो. (फोटो सौजन्य : FreePik) -
हिरव्या पानांच्या भाज्या
पालक, मेथी, सरसो अशा हिरव्या पानांमध्ये भरपूर फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. या भाज्या शरीरातल्या विषारी घटकांचं निर्मूलन करतात आणि पेशी निरोगी राखतात. (फोटो सौजन्य : FreePik) -
संत्री व मोसंबी
व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि विविध अँटीऑक्सिडंट्सने भरलेली ही फळं शरीराला ताजेपणा देतात. त्यामधील घटक पेशींचं संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. (फोटो सौजन्य : FreePik)
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..

Russian Woman : रशियन महिलेचं आठ वर्षांपासून जंगलातल्या होतं गुहेत वास्तव्य, ही महिला इथे कशी पोहोचली? पोलिसांनी काय सांगितलं?