-
पित्ताशय म्हणजे काय?
पित्ताशय हा एक लहानसा अवयव आहे, जो यकृताखाली असतो. यकृत जे पित्त तयार करतं, ते पित्त पित्ताशयात साठवलं जातं. पित्ताशय हे अन्नपचन, विशेषतः चरबीयुक्त अन्नाचं पचन करण्यासाठी उपयोगी असतं. मात्र, पित्ताशयात खडे तयार झाल्यास किंवा सूज आल्यास डॉक्टर ते काढून टाकण्याचा सल्ला देतात. -
यकृत आणि पित्ताशय यांचं नातं
तज्ज्ञांच्या मते, यकृत आणि पित्ताशय हे एकमेकांशी जोडलेले असतात. यकृत पित्त तयार करतं आणि पित्ताशय हे पित्त साठवण्याचं काम करतं. जेव्हा जेवण होतं, तेव्हा हे पित्त लहान आतड्यांमध्ये पाठवलं जातं. म्हणजेच पित्ताशय हे एक प्रकारचं पित्त साठवण्याच्या टाकीचं काम करतं. -
पित्ताशय काढल्यानंतर काय घडतं?
पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया ‘कोलेसिस्टेक्टॉमी’ म्हणून ओळखली जाते. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतरही यकृत पित्त तयार करत राहतं. मात्र, आता पित्त साठवण्यासाठी जागा नसल्याने ते थेट लहान आतड्यामध्ये यामुळे सतत झिरपत राहते. त्यामुळे काही जणांना थोडासा अपचनाचा त्रास होऊ शकतो; पण त्यामुळे यकृतावर कोणताही अतिरिक्त ताण येत नाही. -
तज्ज्ञ काय सांगतात?
पित्ताशय काढून टाकल्यानंतर यकृतावर कोणताही अतिरिक्त ताण पडत नाही. शरीर सामान्यपणे कार्य करतं. काही लोकांना सुरुवातीला पचनासंबंधीचा त्रास होतो. जसे पातळ मल किंवा लहान गोष्टी पचवण्यात अडचण येते; पण काही आठवड्यांत शरीर त्याच्याशी जुळवून घेतं. -
पित्ताशयात खडे का होतात?
या समस्येमागे अनेक कारणं असतात. जास्त तेलकट व चरबीयुक्त आहार, वजनात अचानक वाढ किंवा घट, गर्भधारणा, आनुवंशिकता वगैरे. खडे झाल्यास ते पित्तप्रवाहात अडथळा निर्माण करू शकतात, ज्यामुळे पोटात तीव्र वेदना, उलट्या, ताप अशी लक्षणं दिसू शकतात. -
पित्ताशयातील खड्यांवर कोणते उपचार?
जर पित्ताशयात तयार झालेले खडे लहान असतील आणि कोणतीही लक्षणं दिसत नसतील, तर औषधांनी ते खडे विरघळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, ही प्रक्रिया खूप हळुवार असते आणि ती यशस्वी होण्याची खात्री नसते. -
शस्त्रक्रिया कधी आवश्यक?
पित्ताशयात खडे तयार होण्याचा वारंवार त्रास होत असल्यास शस्त्रक्रिया हेच त्यावर प्रभावी उत्तर ठरतं. आजकाल लॅप्रोस्कोपिक पद्धतीने ही प्रक्रिया सहज, सुरक्षित आणि जलद गतीने केली जाते. -
पित्ताशयाशिवाय जीवन कसं असतं?
पित्ताशयाशिवायही माणूस पूर्णपणे आरोग्यदायी आणि सामान्य जीवन जगू शकतो. तज्ज्ञ सांगतात की, वेळेवर शस्त्रक्रिया केल्यास पचनक्रिया सुधारते आणि जीवनमानाचा दर्जा वाढतो.

“शासन भिकारी आहे”, कृषीमंत्री कोकाटेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद? फडणवीस नाराजी व्यक्त करत म्हणाले…