-
हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे डोळ्यांवर परिणाम होतो आहे. तसेच मोबाईल आणि टीव्हीचा जास्त वापर केल्याने डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. (Photo: Meta AI)
-
यामुळेच लहान वयातच दृष्टी कमकुवत होते आणि चष्मा लावावा लागतो. (Photo: Meta AI)
-
जर तुम्हीही कमकुवत दृष्टीच्या त्रासात असाल आणि तुमच्या चष्म्याचा नंबर सतत वाढत असेल, तर आयुर्वेदिक डॉक्टरांनी सुचवलेले काही घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Photo: Meta AI)
-
तुम्ही डोळ्यांची औषधं, ड्रॉप घेता पण हवा तसा फरक जाणवत नाही, तर त्यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल. (Photo: Meta AI)
-
गाजर, पालक, आवळा, बदाम अशा व्हिटॅमिन ए व सी चा चांगला समावेश असलेल पदार्थ दृष्टी सुधारण्यास मदत करतात, त्यामुळे ते नियमितपणे खाल्ले पाहिजेत. (Photo: Meta AI)
-
डोळ्यांची स्वच्छता व व्यायाम
नियमितपणे डोळे स्वच्छ करणे, डोळ्यांना आराम देणे आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते. जेवणानंतर तोंड पाण्याने धुणे आणि थंड पाण्याने डोळे धुणे यामुळेही दृष्टी मजबूत होते. यासोबतच डोळे वर-खाली, उजवी-डावीकडे हलवणे असे काही सोपे व्यायाम देखील फायदेशीर आहेत. (Photo: Meta AI) -
नियमित तपासणी
डोळ्यांची नियमित तपासणी करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (Photo: Meta AI) -
धूम्रपान टाळा
धूम्रपान करणे टाळा, कारण यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. (Photo: Meta AI) -
आयुर्वेदाने सांगितलेली पावडर
बदाम, काळी मिरी, बडीशेप, वेलची आणि दाणेदार साखर घ्या. हे सर्व बारीक कुटून घ्या. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अर्धा चमचा या पावडरचे सेवन करा. काही दिवसांत तुमची दृष्टी सुधारण्यास सुरुवात होईल.
(महत्वाचे: ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) हेही पाहा –समोसा, जिलेबी हे पदार्थ ‘या’ मुस्लिम देशांतून भारतात आले; यांच्याबाबत तंबाखू विरोधासारखे फलक लागणार

“नेहरूंनी भारताला उभे केले, मनमोहन सिंग यांनी काम करायला लावले आणि मोदींनी…”, प्रसिद्ध डच लेखकाचे मोठे विधान