-
कधीतरी आयुष्यात असा एक क्षण येतो, जेव्हा मन थकलेलं असतं आणि हृदय वेदनांनी भरलेलं असतं. अशा वेळी औषध नव्हे, तर आपल्याला समजून घेणारी शांत अशी जागा हवी असते. भारतात अशी काही ठिकाणं आहेत, जिथे तुम्हाला मनःशांती आणि आराम मिळू शकतो. (फोटो – सोशल मीडिया)
-
हृषिकेश, उत्तराखंड
हृषिकेश केवळ योगा आणि वॉटर राफ्टिंगसाठी नाही, तर भावनिक उपचारासाठीही प्रसिद्ध आहे. गंगेच्या काठी बसून एखाद्याला हृदयातील वेदना धुऊन टाकल्याचा अनुभव मिळतो. गंगेची आरती पाहताना आणि शांततेत फेरफटका मारताना मनाला खूप दिलासा मिळतो. (फोटो – सोशल मीडिया) -
. त्सो मोरीरी, लडाख
त्सो मोरीरी हे १५,००० फूट उंचीवर वसलेलं शांततेचं दुसरं नाव. इथे ना फोन सिग्नल, ना सोशल मीडिया – फक्त निसर्ग, तुम्ही आणि तुमचे विचार. शहराच्या आवाजापासून दूर असलेली ही जागा स्वतःला समजून घेण्याची संधी देते. (फोटो – सोशल मीडिया) -
माजुली बेट, आसाम
ब्रह्मपुत्रा नदीवर वसलेलं माजुली हे जगातील सर्वांत मोठं नदी बेट आहे. निसर्ग, शांतता आणि पक्ष्यांचा गेयता लाभलेला आवाज हे सगळं मनातली गोंधळलेली भावना निववायला पुरेसं आहे. येथे येणाऱ्यांना स्वतःशी नव्यानं भेट होते. (छायाचित्र – सोशल मीडिया) -
बोधगया, बिहार
जिथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, ते बोधगया आजही अंतर्मनातील उत्तरं शोधणाऱ्यांसाठी प्रेरणास्थळ आहे. बोधिवृक्षाखाली बसून मौन धारण करणारे अनेक जण इथे स्वतःच्या वेदनांना समजून घेतात आणि स्वीकारतात. (छायाचित्र – सोशल मीडिया) -
वाराणसी, उत्तर प्रदेश
वाराणसी म्हणजे जीवन-मृत्यूचं संगमस्थळ. घाटांवर केवळ अंत्यसंस्कार नाही; तर दुःख आणि पश्चात्तापही ‘जाळले’ जातात. येथे येणाऱ्या प्रत्येकाला एक वेगळी शांतता, नवी ऊर्जा आणि नव्याने जगण्याची उमेद मिळते. (छायाचित्र – सोशल मीडिया)
( हेही पाहा:नागपूरच्या डॉली चहावालाने आणलं त्याचं फ्रँचायझी मॉडेल; तीन पर्यायांसह सांगितला प्लॅन, वाचा…)
“अजय देवगण १८ वर्षांपासून माझ्याशी बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”