-
जगप्रसिद्ध ज्योतिषी व भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांचे नाव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. जुलै ते डिसेंबर २०२५ या सहा महिन्यांसाठी त्यांनी केलेली भविष्यवाणी खूप उत्सुकता निर्माण करत आहेत.
-
त्यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी तीन राशींच्या लोकांना नशीब, यश व करिअरमध्ये प्रगती साधता येणार आहे. त्यांनी सांगितले की, या भाग्यवान राशींच्या लोकांना स्थिरता, आर्थिक लाभ आणि नव्या संधी मिळतील.
-
चला तर मग पाहूया त्या तीन भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
-
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांची व्यवहारिक विचारसरणी आणि मेहनत याचा चांगला परिणाम त्यांना या सहामाहीत मिळेल. शुक्र ग्रहाच्या मदतीने त्यांना पैसा मिळेल, करिअरमध्ये प्रगती होईल आणि नातेसंबंध मजबूत होतील. ही वेळ म्हणजे मागील मेहनतीचे फळ मिळवण्याची आणि भविष्यासाठी सुरक्षिततेची योजना करण्याची चांगली संधी आहे. -
सिंह राशी
धनप्राप्तीसाठी चांगले योग आहेत. सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात नवीन संबंध, व्यावसायिक भागीदारी किंवा ओळख मिळण्याची शक्यता आहे. जे भावनिक त्रास त्यांनी पूर्वी अनुभवले होते, त्यानंतर २०२५ चा उरलेला वेळ त्यांना स्पष्टता आणि ध्येय देईल. ही वेळ धाडसाने आपले उद्दिष्ट गाठण्याची आणि वैयक्तिक व आर्थिक यशाचा आनंद घेण्याची आहे. -
कुंभ राशी
कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचारांचे आणि हटके विचार करणारे असतात, त्यामुळे यंदा त्यांच्या हुशारीला योग्य सन्मान मिळेल. त्यांची वेगळी विचारसरणी त्यांना व्यवसाय किंवा सर्जनशील क्षेत्रात मोठं यश देईल. २०२५ चा उत्तरार्ध त्यांच्यासाठी नवे दरवाजे उघडेल, त्यांना नाव, प्रसिद्धी व आर्थिक स्थिरता मिळेल. -
बाबा वेंगा कोण आहेत?
बुल्गेरियाच्या बाबा वेंगा यांचे निधन १९९६ साली झाले होते. तरीही, त्यांनी जिवंत असताना काही अशा भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्या नंतर खऱ्या ठरल्या. -
‘बाल्कनच्या नॉस्ट्रॅडॉम्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगांनी ९/११ च्या हल्ल्यांबद्दल आणि बराक ओबामा राष्ट्रपती होतील याबद्दलही अगोदरच सांगितले होते.
-
आजही लाखो लोक त्यांच्या भविष्यवाण्यांवर विश्वास ठेवतात आणि त्यांचे पालन करतात. म्हणूनच २०२५ साठी केलेल्या त्यांच्या भविष्यवाण्या लोकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण करत आहेत. (सर्व फोटो: संग्रहित/LS Graphics Team)

अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”