-
रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवणे हे केवळ मधुमेह असलेल्यांसाठीच नाही तर सतत ऊर्जा टिकवून ठेवू इच्छिणाऱ्या आणि हृदयाच्या आरोग्य चांगले ठेवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे. गोड पदार्थांना दोष देणे अगदी सोपे आहे; कमी माहिती असलेल्या दैनंदिन सवयी तुमच्या ग्लुकोजच्या पातळीत वाढ करण्यास कारणीभूत ठरू शकतात. हायड्रेशन दुर्लक्ष करमे ते बाहेरील अन्नावर जास्त अवलंबून राहण्यापर्यंतच्या सवयींचा यामध्ये समावेश आहे, हे छुपे घटक तुमचा आहार बऱ्यापैकी हेल्दी दिसत असला तरीही तुमच्या शरीरातील असंतुलन निर्माण करू शकतात. health.com च्या अहवालानुसार, या आठ सामान्य सवयी तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकतात.
-
सकाळची सुरुवात साखर असलेल्या पदार्थांनी करणे : एनर्जी ड्रिंक्स किंवा फ्लेवर्ड कॉफीमध्ये १० चमच्यांपेक्षा जास्त साखर असू शकते. रिकाम्या पोटी घेतल्यास हे हानिकारक ठरू शकते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
तीव्र ताण : दीर्घकाळापर्यंत ताणामुळे कॉर्टिसॉल वाढते, ज्यामुळे केवळ ग्लुकोजची पातळी वाढत नाही तर साखरेची तल्लफ देखील वाढते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
प्रथिने आणि फायबरचे कमी सेवन: ज्या जेवणात फायबर आणि प्रथिने नसतात त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
झोपेचा पॅटर्न योग्य नसणे: झोपेचा अभाव इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम करू शकतो आणि यामुळे जास्त साखर आणि जास्त कार्बयुक्त पदार्थ खाण्याची भूक वाढवू शकतो. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
खूपच जास्त वेळ बसणे आणि कमी हालचाल : बैठी जीवनशैलीमुळे इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते. जेवणानंतर काही काळ चालल्याने ग्लुकोज नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
दररोज गोड पेये पिणे: साखर घालून गोड केलेला रस आणि सोडा नियमितपणे घेतल्यास चयापचय समस्या आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
कमी पाणी पिणे: डिहायड्रेशनमुळे कॉर्टिसोल आणि व्हॅसोप्रेसिन सारखे हार्मोन्स सक्रिय होतात, हे दोन्ही रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यास जबाबदार असतात. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
वारंवार फास्ट फूडचे सेवन : बाहेरच्या फास्च फूडमध्ये सहसा रिफाइंड कार्ब्स आणि अनहेल्दी फॅट्स जास्त असतात. या दोन्हीमध्ये साखरेचे प्रमाण जलद वाढवण्याची क्षमता असते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली