-
जेव्हा आपल्या शरीरात काही त्रास होतो, तेव्हा त्याची लक्षणं शरीरात दिसायला लागतात. लिव्हर (यकृत) हा आपल्या शरीरातला एक महत्वाचा अवयव आहे. लिव्हर एकटाच ५०० पेक्षा जास्त महत्त्वाची कामं करतो. लिव्हरची मुख्य कामं म्हणजे शरीरातून विषारी घटक (toxins) बाहेर टाकणं, चरबी (फॅट) कमी करणे आणि हार्मोन्सचं संतुलन राखणं.
-
पण जेव्हा लिव्हर व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा त्याची पहिली लक्षणं आपल्या पायांमध्ये दिसू शकतात. आपल्याला पाय सुजणं, पायांवर खुणा येणं किंवा त्वचेत बदल होणं हे सामान्य वाटतं, म्हणून आपण ते दुर्लक्षित करतो. पण जर अशी स्थिती सतत राहिली, तर ते लिव्हर बिघडल्याचं लक्षण असू शकतं.
-
लिव्हरमध्ये काहीतरी त्रास झाल्यास शरीरात त्याची काही लक्षणं दिसू लागतात, जसं की अशक्तपणा येणं, भूक कमी लागणं, उलटी होणं, नीट झोप न येणं, दिवसभर थकवा वाटणं, अंगात सुस्ती असणं आणि वजन झपाट्यानं कमी होणं.
-
पण तुम्हाला माहिती आहे का, की लिव्हर खराब झाल्यावर त्याची लक्षणं पायांमध्येही दिसू लागतात. डॉ. एरिक बर्ग यांच्या मते, जेव्हा लिव्हर योग्यरित्या काम करत नाही, तेव्हा त्याची ६ लक्षणं पायांमध्ये दिसू शकतात. चला तर मग जाणून घेऊया की लिव्हर खराब झाल्यास पायांमध्ये कोणती लक्षणं दिसतात.
-
जर पायांवर लाल आणि तपकिरी रंगाचे डाग दिसले, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, लिव्हर खराब झाल्यास असे डाग पायांवर दिसायला लागतात. हे डाग विशेषतः गुडघ्यांखाली आणि पायांच्या वरच्या भागात दिसतात आणि लाल चकत्यांसारखे वाटतात. जेव्हा लिव्हरमध्ये चरबी साठते, तेव्हा ही समस्या होते.
-
घोट्यांवर आणि पायांवर शिरांचे जाळे
स्पायडर वेन्स या खूप पातळ आणि जाळ्यासारख्या शिरा असतात ज्या त्वचेच्या थोड्याच खाली दिसतात. या सहसा पायांवर आणि घोट्यांवर दिसतात. जेव्हा एखाद्याला लिव्हर सिरोसिस होतो, तेव्हा शरीरात एस्ट्रोजेन हार्मोनचं संतुलन बिघडतं. या हार्मोनच्या गडबडीमुळे शिरा फुगायला लागतात आणि स्पायडर वेन्स होण्याची शक्यता वाढते. पायांवर शिरांचं जाळं दिसणं हे लिव्हर खराब होण्याचं लक्षण असू शकतं. -
टाचांना भेगा पडणे
टाचांना भेगा पडणे हे सहसा पायांची नीट काळजी न घेतल्यामुळे होतं, पण कधी कधी या भेगा लिव्हर खराब होण्याचंही लक्षण असू शकतात. लिव्हर खराब झाल्यास शरीरातले काही चरबीत विरघळणारे जीवनसत्त्वं – जसं की व्हिटॅमिन A, D, E आणि K – यांचं शोषण कमी होऊ शकतं. विशेषतः व्हिटॅमिन A कमी झाल्यास टाचांची त्वचा जाड, कोरडी आणि फाटलेली होते. -
पायांमध्ये उष्णता आणि जळजळ
लिव्हर खराब झाल्यास पायांमध्ये एक लक्षण दिसतं, ते म्हणजे पाय गरम होणं. रात्री पायांच्या तळव्यांमध्ये जळजळ आणि उष्णता जाणवणं हे नेहमीच थकवा किंवा नसांच्या त्रासामुळे होतं असं नाही. ही लक्षणं लिव्हर खराब झाल्यासही दिसू शकतात. जेव्हा लिव्हर खूपच खराब होतो, तेव्हा तो नसांवर परिणाम करतो, ज्यामुळे पायांमध्ये जळजळ किंवा झिणझिणी सारखी समस्या होऊ शकते. जेव्हा लिव्हर शरीरातून विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा रक्तात अमोनियाचं प्रमाण वाढतं, जे नसांना इरिटेट शकतं. -
पायाची सूज
जर पाय किंवा घोट्यांवरील सुजलेल्या जागेवर बोटाने दाबल्यावर काही सेकंदांसाठी खळीसारखा खोलगट भाग दिसला, तर याला पिटिंग एडीमा म्हणतात. लिव्हरचं नुकसान, विशेषतः सिरोसिसमध्ये, रक्तात अल्ब्युमिन नावाच्या प्रोटीनची मात्रा कमी होते. अल्ब्युमिन शरीरात द्रवाचं (fluid) संतुलन ठेवण्याचं काम करतं. जेव्हा याची कमतरता होते, तेव्हा शरीरातला हा द्रव जवळच्या टिशूमध्ये जाऊ लागतो. याचं पहिलं लक्षण म्हणजे पाय आणि घोट्यांमध्ये सूज येणं. पायांमध्ये दिसणारी ही सूज लिव्हरच्या मोठ्या समस्येचं स्पष्ट लक्षण असू शकतं, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये. -
पायातून दुर्गंधी येणे
सहसा पायांमधून दुर्गंध येण्याचं कारण बॅक्टेरिया आणि घाम असं मानलं जातं, पण ही लक्षणं लिव्हरच्या आजाराचंही संकेत असू शकतात. जेव्हा लिव्हर योग्यरित्या काम करत नाही आणि शरीरातून विषारी घटक (toxins) नीट बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा हे विषारी पदार्थ घामाद्वारे शरीरातून बाहेर पडू लागतात, ज्यात पायांच्या ग्रंथ्याही येतात. लिव्हर खराब झाल्याने शरीराचं मेटाबॉलिझम आणि हार्मोनचं संतुलन बिघडू शकतं, ज्यामुळे पायांतून येणारी दुर्गंध सामान्यपेक्षा जास्त तीव्र आणि विचित्र होऊ शकते. अशा स्थितीत पाय नीट स्वच्छ करूनही दुर्गंध येत राहतो. (All Photos- Freepik)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”