-
चेहऱ्यावरील फुगलेपणा कमी करण्यासाठी आहारातून दूध, चीज, दही यांसारखे दुग्धजन्य पदार्थ कमी करा. हे पदार्थ पाणी साठवण्याची प्रवृत्ती वाढवतात. याऐवजी बदाम दूध, सोया दूध किंवा ओट मिल्कसारखे पर्याय वापरल्यास फायदा होतो.
-
वजन आणि चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी फायबरयुक्त अन्न महत्त्वाचे आहे. फायबर पचन सुधारते आणि अनावश्यक भूक कमी करते. जेवणात पालेभाज्या, डाळी, कडधान्ये आणि धान्यांचा समावेश करा.
-
रोजच्या आहारात सफरचंद, बेरी, संत्री यांसारखी फळं समाविष्ट करा. या फळांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचे आरोग्य सुधारतात आणि चेहरा तजेला दिसतो.
-
पाणी पुरेसे पिणे चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. साध्या पाण्यासोबत डिटॉक्स ज्यूस घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि त्वचेचा तजेला वाढतो.
-
जास्त चावावे लागणारे पदार्थ खाल्ल्याने चेहऱ्याचे स्नायू सक्रिय होतात. कच्च्या भाज्या, ड्रायफ्रूट्स, मका आणि कुरकुरीत फळे खाणे जबड्याचे स्नायू टोन करते आणि चेहरा घट्ट दिसतो.
-
फेस योगा किंवा चेहऱ्याचे व्यायाम दररोज १०-१५ मिनिटं करा. या व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्वचा ताठ राहते आणि सैलपणा कमी होतो.
-
प्रोसेस्ड, तळलेले आणि जास्त मसालेदार अन्न कमी करा. अशा पदार्थांमुळे पाणी साठणे, पचन बिघडणे आणि चेहऱ्यावर फुगीरपणा येणे शक्य असते.
-
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साठते आणि चेहरा सुजतो. त्यामुळे मिठाचे प्रमाण कमी ठेवा आणि प्रोसेस्ड अन्न टाळा, ज्यात मीठ जास्त प्रमाणात असते.
-
दररोज पुरेशी झोप घेणे ही चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आवश्यक सवय आहे. झोपेमुळे ताण कमी होतो, हार्मोन्स संतुलित राहतात आणि चेहऱ्यावरील सूज नैसर्गिकरीत्या उतरते.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”