-
नाश्ता वगळणे
सकाळचा नाश्ता सर्वा महत्त्वाचा असतो. हा नाश्ता वगळल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर थकलेले राहता. तुमचं कामात लक्ष लागत नाही. प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्सयुक्त नाश्ता करणं गरजेचं असतं. (Source: Photo by unsplash) -
जास्त स्क्रीन टाइम (अत्याधिक स्क्रीनकडे पाहणे)
जास्त स्क्रीन टाइम, विशेषतः झोपण्यापूर्वी स्क्रीनवर अधिक वेळ घालवणं खूप घातक आहे, जे तुमच्या circadian rhythm मध्ये (आपलं शरिराचं दिवसभराचं नैसर्गिक घड्याळ) व्यत्यय आणतं. उपकरणांमधून येणारा निळा प्रकाश मेलाटोनिनचे प्रमाण कमी करतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते आणि दिवसभर झोप येणे किंवा आळस जाणवणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. (Source: Photo by unsplash) -
शारीरिक हालचालीचा अभाव
बसून राहण्याची जीवनशैली शरीर आणि मनाला सुस्त बनवते. दररोज थोडं चालल्याने किंवा हलकं स्ट्रेचिंग केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि तुम्हाला एनर्जेटिक वाटतं. यामुळे झोपही सुधारते. (Source: Photo by unsplash) -
पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)
पुरेसं पाणी न पिल्याने थकवा, डोकेदुखी आणि लक्ष केंद्रित न होण्यासारख्या समस्या उद्भवतात. शरीर हायड्रेटेड ठेवणं ऊर्जा आणि एकाग्रता टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहे. (Source: Photo by unsplash) -
Overloading on Caffeine (जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन)
कॅफीन तात्पुरती ऊर्जा देऊ शकते, पण नंतर थकवा वाढणे आणि ऊर्जा कमी होण्याची समस्या निर्माण होते. कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्सवर जास्त अवलंबून राहिल्याने शरीराची नैसर्गिक ऊर्जा, आपलं संतुलन आणि झोपेची लय (sleep cycle) बिघडते. (Source: Photo by unsplash) -
अयोग्य झोपेची सवय
झोपेच्या अनियमित वेळा शरीराच्या जैविक घड्याळाला गोंधळात टाकते. दररोज वेगवेगळ्या वेळी झोपणं आणि उठणं यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. (Source: Photo by unsplash)

आज गणेश चतुर्थीला ‘या’ ३ राशींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा! अचानक धनलाभ तर आयुष्यातील अडचणी अखेर होतील दूर