-
भारतीय घरातील चमत्कारी
मसाले भारतीय स्वयंपाकघरात असणारे मसाले केवळ चव वाढवत नाहीत, तर आयुर्वेदानुसार गंभीर आजारांवरही ते उपयोगी ठरतात. (Photo: Unsplash) -
छोट्याशा गरम मसाल्याच्या पदार्थाचे मोठे फायदे
लवंग जरी लहान असली तरी तिच्यात असंख्य गुणधर्म आहेत. जेवणाला चव देण्यासोबतच ती शरीरासाठी अमृतासारखी आहे. (Photo: Unsplash) -
रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे गुण
लवंगेत मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. तिच्या नियमित सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. (Photo: Freepik) -
सर्दी-खोकल्यावर उपाय
लवंगेचे पाणी सर्दी, खोकला आणि ऋतुजन्य आजारांपासून बचाव करण्यास उपयुक्त ठरते. (Photo: Freepik) -
चांगली झोप मिळविण्यासाठी फायदेशीर.
लवंगेमध्ये युजेनॉल हा नैसर्गिक झोप मिळवून देणारा घटक आढळतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. (Photo: Pexels) -
दातदुखीवर रामबाण दातदुखी, डोकेदुखी, स्नायुदुखी, तसेच थकवा कमी करण्यासाठीही लवंगेचे पाणी उपयुक्त आहे. (Photo: Pexels)
-
तोंडाला येतो ताजेतवानेपणा
लवंगांच्या पाण्यातील नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणामुळे दुर्गंधी कमी होते आणि तोंड ताजेतवाने राहते. (Photo: Freepik) -
वजन कमी करण्यास मदत
लवंग पचन सुधारून मेटाबॉलिझम वाढवते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. (Photo: Freepik) -
पचनक्रिया सुधारते
रात्री झोपण्यापूर्वी लवंगांचे पाणी प्यायल्यास गॅस, पोटफुगी आणि अपचनाची समस्या दूर होते. (Photo: Freepik) -
गळ्याच्या त्रासावर आराम
लवंगेतील अँटी-इम्फ्लेमेटरी गुण गळ्याची खवखव, जळजळ व खोकला कमी करण्यात मदत करतात. (Photo: Unsplash)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात