-
अपुऱ्या झोपेचा आपल्या शरीरातील उर्जेवर परिणाम होतो. यासह आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. (Photo Source: Unsplash)
-
मेंदूची कार्यक्षमता घटते : स्मरणशक्ती कमी होते. लक्ष केंद्रित करणे आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, परिणामी आपल्या प्रतिक्रिया मंदावतात आणि कार्यक्षमतेत घट होते. (Photo Source: Unsplash)
-
हृदयविकारांचा धोका वाढतो: झोप कमी झाल्यास उच्च रक्तदाब, अनियमित हृदयाची धडधड आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. (Photo Source: Unsplash)
-
हार्मोन्समध्ये असंतुलन: झोपेच्या अभावामुळे भूक आणि ताण नियंत्रित करणारे हार्मोन्स विस्कळीत होतात, ज्यामुळे जास्त खाणे आणि वजनात वाढ होते. (Photo Source: Unsplash)
-
इम्यून सिस्टिम कमजोर होते : झोपेच्या अभावामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार वारंवार होतात. (Photo Source: Unsplash)
-
चिडचिडेपणा वाढतो: झोपेचा अभाव anxiety (भीती), अस्वस्थता आणि चिडचिडेपणाशी संबंधित असतो, ज्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. (Photo Source: Unsplash)
-
शारीरिक कार्यक्षमता कमी होते : स्नायूंची रिकव्हरी मंदावते, समन्वय कमजोर होतो आणि व्यायाम किंवा दैनंदिन कामकाजात दुखापतीचा धोका वाढतो. (Photo Source: Unsplash)

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा