-    आपले भविष्य कसे असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये असते. मागील काही वर्षांमध्ये जगभरामध्ये अशा काही धक्कादायक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे हल्ली भविष्य ऐकण्याकडे आणि वाचण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. यामध्ये काही भविष्यवाण्या सुप्रसिद्ध भविष्यवक्ता ‘बाबा वेंगा’ यांनी केलेल्या आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) 
-    अनेकांच्या मते, बाबा वेंगांच्या भविष्यवाण्या ८५ टक्के खऱ्या ठरतात. जागतिक माहामारी, लाखो लोकांचे मृत्यू, काही देशांमधील युद्ध यांपैकी अनेक भविष्यवाण्या मागील काही वर्षांत खऱ्या ठरल्या आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) 
-    आता सप्टेंबर २०२५ सुरू असून बाबा वेंगाने २०२५ साठी केलेल्या युद्ध, हिंसा, महापूर यांसारख्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) 
-    दरम्यान, बाबा वेंगाने २०२५ मधील भाग्यशाली राशी कोणत्या हे देखील सांगितले होते. त्यानुसार या भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊ (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) 
-    कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी केलेल्या २०२५ च्या भविष्यवाणीनुसार, आयुष्यात काही मोठे अविस्मरणीय बदल होतील, या काळात आयुष्यात यश, कीर्ती कमवाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. अनेक मार्गाने पैसा कमवाल ज्यामुळे आयुष्यात सुखी-समाधानी राहाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) 
-    मिथुन राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनात लक्षणीय बदल होतील. तुमच्याकडे तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी निर्माण करण्याची शक्ती आहे आणि आता त्या गोष्टी मिळवण्याची वेळ आली आहे. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) 
-    वृषभ राशीच्या व्यक्तींना या वर्षात अनेक आर्थिक लाभ होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अचानक धनलाभ होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आयुष्यात सुख-शांती निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) 
-    (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) 
-    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) 
 
  बापरे! आता काय जीवच घेणार का? पाणीपुरीच्या पुऱ्या बघा कशा बनतात; VIDEO पाहून यापुढे रस्त्यावर पाणीपुरी खाताना शंभर वेळा विचार कराल 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  