-
हिंदू धर्मात पितृ पक्षाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील १५ दिवस विशेष मानले जातात, ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे. पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्योतिषशास्त्रातही पितृ पक्षाला खूप महत्वपूर्ण स्थान प्राप्त आहे. १२ राशींपैकी अशा काही राशी आहेत ज्यांच्यावर पितरांची विशेष कृपा असते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींवर त्यांच्या पितरांची विशेष कृपा असते. पितर नेहमीच त्यांच्यावर प्रसन्न असतात आणि त्यांना प्रत्येक कामात यश देतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
धनु राशीच्या व्यक्तींवर पितर नेहमीच प्रसन्न असतात. पितरांच्या आशीर्वादाने या राशीच्या व्यक्तींचे भाग्य उजळते. या काळात नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मकर राशीच्या व्यक्तींवरदेखील पितरांचा आशीर्वाद असतो. पितरांच्या कृपेने नेहमीच या व्यक्तींना भरपूर पैसा आणि करिअरमध्ये यश मिळते. पितृ पक्षाचा काळही या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अष्टकोनी आकाराचा बंगला, सात दरवाजे अन्…; सेलिब्रिटी जोडपं का सोडणार आलिशान घर? कारण आलं समोर