-
महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानातही अनेक मोठमोठे आणि उत्तुंग असे किल्ले आहेत. तुम्हाला किल्ले किंवा पुरातन वास्तू, इमारती पाहायला आवडत असतील तर राजस्थान सफर हा एक चांगला पर्याय आहे. आम्ही तुम्हाला राजस्थानमधील काही सुंदर किल्ल्यांविषयी माहिती देणार आहोत. (Photo Source: unsplash)
-
अम्बर किल्ला, जयपूर : हा किल्ला भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. अम्बर किल्ला राजपुत आणि मुघल कलेचा उत्तम मिलाफ आहे. (Photo Source: unsplash)
-
चित्तोडगड : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेला, चित्तोडगड हा राजपुतांचा अभिमान, त्यांचं बलिदान आणि राणी पद्मिनीच्या बलिदानाचं प्रतीक आहे. (Photo Source: unsplash)
-
जैसलमेर किल्ला : जैसलमेरचा किल्ला राजस्थानमधील एक ऐतिहासिक आणि भव्य किल्ला आहे. हा गोल्डन फोर्ट म्हणूनही ओळखला जातो. कारण पिवळ्या वाळूच्या वीटा आणि पिवळ्या रंगाच्या दगडांनी बांधलेला हा किल्ला सूर्यप्रकाशात सोन्यासारखा चमकतो. (Photo Source: unsplash)
-
जुनागड (बिकानेरचा किल्ला) : बिकानेरमधील जुनागड किल्ला हा एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे, जो १५८९ मध्ये राजा रायसिंह यांनी बांधला आहे. या किल्ल्याच्या रचनेत राजस्थानच्या राजपूत स्थापत्यशैलीसह मुघलांचा प्रभावही दिसतो. जुनागडमध्ये सुंदर महाल, मंदिरं आणि संग्रहालय आहे, जे बिकानेरच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात.(Photo Source: unsplash)
-
कुंभलगड : कुंभलगड हा राजस्थानातील अरवली पर्वतरांगांमध्ये स्थित असून तो महाराणा कुंभाने १५ व्या शतकात बांधला होता. या किल्ल्याची भिंत चीनच्या भिंतीनंतर (ग्रेट वॉल ऑफ चायना)दुसऱ्या क्रमांकाची मोठी भिंत म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. (Photo Source: unsplash)
-
मेहरानगड (जोधपूर): मेहरानगड किल्ला जोधपूर शहराच्या वर उंच टेकडीवर वसलेला असून तो राजस्थानातील सर्वात भव्य आणि मजबूत किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला राव जोधा यांनी १४५९ मध्ये बांधला. किल्ल्यात सुंदर महाल, हिरे-मोत्यांनी सजवलेले दरबार आणि शस्त्रसंग्रहालय आहे, जे मारवाडच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. (Photo Source: unsplash)

US H 1B Visa News: ‘रविवारच्या आधी अमेरिकेत परत या’, ट्रम्प यांच्या निर्णयामुळं Microsoft, Amazon कंपन्यांची धावाधाव; कर्मचाऱ्यांना दिला इशारा