-
Vitamin D Increase Foods: ‘व्हिटॅमिन डी’ची पातळी वाढवण्याचा सर्वात नैतिक मार्ग म्हणजे सूर्यप्रकाश. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
फॅटी फिश, जसे की सॅल्मन (रावस) आणि मॅकेरल (बांगडा) ‘व्हिटॅमिन डी’ने समृद्ध असतात.
-
गाईचे दूध, दही, चीज, बटर यामध्ये ‘व्हिटॅमिन डी’ व कॅल्शियम असते.
-
संत्र्याचा रस आणि काही सीरियल्स यांसारख्या फोर्टिफाइड खाद्यपदार्थांमध्येही ‘व्हिटॅमिन डी’ असते.
-
अंडी आणि सूर्यप्रकाशात वाढवलेली मशरूमदेखील थोड्या प्रमाणात हे पोषणतत्त्व देतात.
-
आहारातून व्हिटॅमिन डी मिळवणे फायदेशीर असले तरी डॉ. मनीषा अरोरा, सीके बिर्ला हॉस्पिटल, दिल्लीमधील अंतर्गत औषध विभागाच्या संचालिका यांनी सांगितले की, ज्यांची व्हिटॅमिन डीची पातळी अत्यंत कमी आहे, त्यांना फक्त आहारावरून योग्य व्हिटॅमिन डी मिळवता येऊ शकत नाही.
-
कमी ‘व्हिटॅमिन डी’मुळे प्रौढांमध्ये ऑस्टिओमॅलेशिया (हाडे कमकुवत होणे) होऊ शकतो, ज्यामुळे वेदना आणि स्नायू कमकुवत होतात.

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…