-
हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. पितृ पक्ष ७ सप्टेंबर रोजी सुरू झाला असून, २१ सप्टेंबर रोजी संपणार आहे.
(फोटो सौजन्य: Freepik and AI) -
भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंतच्या १५ दिवसांच्या काळात पितृ पंधरवडा म्हणजेच पितृ पक्ष केले जाते. (फोटो सौजन्य: Freepik and AI)
-
पितृ पक्षाच्या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात. या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. (फोटो सौजन्य: Freepik and AI)
-
पितृदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून हा काळ खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती निधन पावली, तर आपण त्या व्यक्तीचं त्या तिथीला श्राद्ध करतो. (फोटो सौजन्य: Freepik and AI)
-
मात्र, काही कारणानं हे श्राद्ध करणं राहून गेलं असेल, तर त्या कालावधीत ते केल्यास त्याच्या आत्म्याला शांती मिळते. (फोटो सौजन्य: Freepik and AI)
-
मात्र, या १५ दिवसांच्या काळात घरामध्ये कोणतही शुभ कार्य केले जात नाही. (फोटो सौजन्य: Freepik and AI)
-
परंतु, जर पितृ पक्षाच्या काळात घरामध्ये मूल जन्माला आलं, तर अशा मुलाचं भाग्य कसं असेत, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. (फोटो सौजन्य: Freepik and AI)
-
हिंदू मान्यतेनुसार या १५ दिवसांत जन्म घेणाऱ्या मुलांवर पितरांची विशेष कृपा असते. अशी मुलं आयुष्यात पुढे जाऊन प्रत्येक परीक्षेमध्ये यशस्वी होतात. पितृ पक्षामध्ये जन्माला आलेल्या मुलांना अत्यंत सौभाग्यशाली मानलं जातं. (फोटो सौजन्य: Freepik and AI)
-
पितृ पक्षातील जन्मलेली मुलं इतरांच्या तुलनेत खूप समजूतदार, शांत असतात. वयाच्या तुलनेत ती लवकर सर्व गोष्टी आत्मसात करतात. (फोटो सौजन्य: Freepik and AI)
-
ज्योतिषशास्त्राच्या मते, पितृ पक्षामध्ये जन्म घेणाऱ्या मुलांचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असतं. ती आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार असतात. (फोटो सौजन्य: Freepik and AI)

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”