-
दमास्कस (सिरिया), बायब्लोस (लेबनॉन), वाराणसी (भारत), अथेन्स (ग्रीस) आणि जेरुसलेम (इस्रायल) ही जगातील काही जुनी शहरं आहेत. इ.स. पूर्व ४००० वर्षांपासून महत्त्वाचं व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेलं दमास्कस हे खूप सुंदर शहर आहे. तसेच भूमध्य समुद्रकिनारी वसलेले बायब्लोस हे फिनिशियन संस्कृतीचे महत्त्वाचे बंदर व लिपीच्या प्रसारासाठी ओळखले जाते. तर, भारतातील वाराणसी हे इ.स.पूर्व ३००० च्या आसपासचे धार्मिक व सांस्कृतिक केंद्र मानले जाते. हिंदू परंपरेत या शहराला महत्त्वाचं स्थान आहे. तर ग्रीसची राजधानी अथेन्स हे शहर देखील इ. स. पूर्व ३००० साली वसवण्यात आलं आहे. लोकसंस्कृती, तत्त्वज्ञान आणि लोकशाहीचं उगमस्थान म्हणून जागतिक इतिहासात या शहराचं महत्त्वाचं स्थान आहे. (Photo Source : wikimedia commons)
-
अथेन्स, ग्रीस : हे शहर लोकशाही आणि तत्त्वज्ञानाचं जन्मसठिकाण म्हणून ओळखलं जातं. हे शहर इसवी सन पूर्व ३००० वर्षांपूर्वी वसवण्यात आलं आहे. (Photo Source : wikimedia commons)
-
बायब्लोस, लेबनान : युनेस्को जागतिक वारसा स्थळ आणि सर्वात जुन्या फोनीशियन शहरांपैकी एक असं हे आजही भेट देण्यासाठी, फिरण्यासाठी उत्तम शहर आहे. (Photo Source : wikimedia commons)
-
वाराणसी, भारत : जगातील सर्वात प्राचीन शहर. गंगेचा घाट व अध्यात्मिक उर्जेसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. (Photo Source : wikimedia commons)
-
दमास्कस, सीरिया : प्राचीन मशिदी आणि ऐतिहासिक वास्तूकलेसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. (Photo Source : wikimedia commons)
-
जेरुसलेम, इस्रायल : मुस्लीम, ज्यू आणि ख्रिस्ती या तिन्ही धर्मांसाठी पवित्र असलेले हे शहर हजारो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार आहे. (Photo Source : wikimedia commons)
-
लुक्सोर, इजिप्त : पूर्वी थेब्स म्हणून ओळखले जाणारे हे शहर फॅरोच्या काळातील मंदिरे, समाध्या आणि ‘व्हॅली ऑफ द किंग्ज’साठी प्रसिद्ध आहे. (Photo Source : wikimedia commons)

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”