-
तुमच्या स्वयंपाकघरात त्वचा सुंदर व तजेलदार करण्यासाठीचे पदार्थ आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि निरोगी फॅट्स असतात, जे त्वचेची काळजी घेतात, मुरुमांपासून मुक्ती मिळवून देतात, वृद्धत्वाचा वेग मंद करतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही सुपफूड्स सांगणार आहोत, जे तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो मिळवून देतील. (PC : Unsplash)
-
हळद : हळदीत कर्क्यूमिन असतं, जे एक नैसर्गिक अँटी-इन्फ्लेमेन्टरी आहे आणि मुरुमांशी लढण्यास मदत करतं. यामुळे पिग्मेंटेशन कमी होतं आणि त्वचेला ग्लो मिळतो. (PC : Unsplash)
-
मूग डाळ: मूग डाळ प्रथिनांनी समृद्ध असते आणि त्यात डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात, जे खराब झालेल्या त्वचेला दुरुस्त करण्यास आणि तिच्या टेक्स्चरला सुधारण्यास मदत करतात. (PC : Unsplash)
-
तूप : भारतीय घराघरांत असलेले तूप निरोगी फॅट्स आणि जीवनसत्त्व A ने भरलेले असते, जे त्वचेला खोलवर पोषण देतात आणि त्वचेला मऊ व लवचिक ठेवतात. (PC : Unsplash)
-
नारळ: नारळाचे पाणी त्वचेला हायड्रेट ठेवते आणि चमक देते, तर खोबऱ्याचं तेल त्वचेतील कोरडेपणा दूर करतं. (PC : Unsplash)
-
आवळा (Indian Gooseberry): आवळा हा जीवनसत्त्व C चं पावरहाऊस आहे, जो कोलेजन उत्पादन वाढवतो आणि त्वचेचा रंग उजळवतो. तसेच, तो विषारी पदार्थ बाहेर काढतो आणि त्वचेला स्वच्छ व निरोगी ठेवतो. (PC : Unsplash)
-
बदाम: बदाम जीवनसत्त्व E ने भरलेले असतात, जे खराब झालेल्या त्वचेची दुरुस्ती करतात आणि त्वचेच्या वृद्धत्वाचा वेग मंदावतात. (PC : Unsplash)

Afghanistan : पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धामागे भारताचा हात? इस्लामाबादच्या आरोपांवर तालिबानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…