-
ताक (Buttermilk)
ताक हे एक प्रो-बायोटिक आणि कॅल्शियमने समृद्ध असे दुधापासून बनलेले पेय आहे. हे पेय पचन सुधारते, चांगल्या जीवाणूंच्या वाढीस मदत करून, पोटफुगी कमी करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
आले-चहा (Ginger Tea)
आले पचनसंस्थेसाठी उपयुक्त आहे आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी भरलेले आहे. हे गॅस, पोटफुगी आणि मळमळ कमी करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
ग्रीन टी (Green Tea)
ग्रीन टी हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, विशेषतः कॅटेचिन्स. हे पचनसंस्थेतील सूज कमी करते आणि एक संतुलित मायक्रोबायोम तयार करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
बडीशेप दाण्याचे पाणी (Fennel Seed Water)
बडीशेप दाणे गॅस आणि पोटफुगी कमी करण्यासमदत करतात. त्यात अनेथोल नावाचे घटक असतात, जे पचनाच्या एंझाइम्सची निर्मिती वाढवतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
केफिर (Kefir)
केफिर हे एक फर्मेंटेड पेय आहे, जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे B, K2 व खनिजे असतात, जी प्रतिकारशक्तीसही चालना देतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
नारळपाणी (Coconut Water)
नारळाचे पाणी नैसर्गिक हायड्रेशन देते. ते इलेक्ट्रोलाइट्सनेही समृद्ध आहे. त्यामुळे पचन सुधारण्यास आणि पोषक द्रव्ये शोषण्यास मदत मिळते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
कोम्बुचा (Kombucha)
कोम्बुचा हा फर्मेंटेड चहा आहे, जो प्रो-बायोटिक्सने भरलेला आहे. त्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
ACV पाण्यात विरघळवून घेतल्यास पचन सुधारते. ते अॅसिटिक अॅसिड पोषण वाढवते; परंतु काही लोकांसाठी ते त्रासदायक ठरू शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
हर्बल चहा (Herbal Teas)
पेपरमिंट आणि कॅमोमाइलसारखा हर्बल चहा पचनसंस्थेला आराम देतो. त्यामुळे आतड्यांचे स्नायू सैल होतात, सूज कमी होते आणि पचनसंस्थेला आराम मिळतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
सूचना : ही माहिती फक्त सामान्य माहितीपुरती आहे. वैद्यकीय सल्ल्याला हा पर्याय नाही. अधिक माहिती किंवा वैयक्तिक सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”