-
Health Benefits Of Eating Peanuts Everyday: शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने (Protein) आणि फायबर (Fiber) असतात.
-
शेंगदाणे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि भूक लवकर लागत नाही.
-
यामुळे अनावश्यक खाणे टाळता येते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
-
शेंगदाण्यामधील घटक शरीरातील ‘खराब कोलेस्ट्रॉल’ (LDL) कमी करतात आणि ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ (HDL) वाढवतात.
-
शेंगदाणे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित राहण्यास मदत होते.
-
शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) अचानक वाढत नाही.
-
शेंगदाण्यामधील फायबरमुळे पचनसंस्था मजबूत होते आणि बद्धकोष्ठता (Constipation) सारख्या समस्या दूर होतात.
-
शेंगदाणे तुम्ही भाजून, उकडलेले किंवा भिजवून खाऊ शकता.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या… (हेही पाहा : नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करताय? कसा असावा आहार, अशी घ्या आरोग्याची काळजी)

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”