-
आकाराने लहान पण अनेक पर्यटन स्थळं असणाऱ्या काही देशांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. जेणेकरून ज्या लोकांना परदेशवारी करायची आहे परंतु, त्यांचं बजेट कमी आहे ते लोक या देशांना भेटी देऊ शकतात. या देशांमध्ये आश्चर्यकारक दृष्य, अनोखी संस्कृती, स्वच्छ समुद्रकिनारेक, हिरवळीने नटलेले डोंगर व अनेक सुंदर ठिकाणं आहेत. (Photo Source : Wikimedia Commons)
-
अँडोरा : स्कीइंग करू इच्छिणाऱ्यांसाठी, हायकर्ससाठी अँडोरा हा देश उत्तम आहे. पिरेनीज ही नैऋत्य युरोपातील स्पेन व फ्रान्स देशांची नैसर्गिक सीमा ठरवणारी पर्वतरांग यासाठी उत्तम पर्याय आहे. याच पर्वतरांगेत अँडोरा देश देखील वसलेला आहे. तसेच येथे बजेट फ्रेंडली खरेदीसाठी ड्युटी फ्री शॉपिंगची सुविधा उपलब्ध आहे. (Photo Source : Wikimedia Commons)
-
लिचटेनस्टाइन : स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियामधील या पर्वतीय प्रदेशात फिरणं म्हणजे स्वर्गसुख. स्कीइंग करू इच्छिणाऱ्यांसाठी, हायकर्ससाठी हा देश उत्तम आहे. या देशात अनेक किल्ले देखील आहेत. (Photo Source : Wikimedia Commons)
-
माल्टा : माल्टा हा देश भूमध्यसागरातील एक बेट आहे. प्राचीन मंदिरे, निळंशार पाणी, आकर्षक समुद्रकिनारे यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. येथील वास्तूंवर तुम्हाला युरोपीय आणि अरबी प्रभाव दिसेल. (Photo Source : Wikimedia Commons)
-
मोनॅको : ग्लॅमरस कॅसिनो, यॉट्स अन् फॉर्म्युला १ रेसिंगसाठी हा देश प्रसिद्ध आहे. या यादीतील इतर देशांच्या तुलनेत थोडा महागडा परंतु आकर्षक असा हा देश आहे. लग्झरी ट्रॅव्हलर्सच्या बकेट लिस्टमध्ये तुम्हाला मोनॅको देखील दिसेल. (Photo Source : Wikimedia Commons)
-
सॅन मरीनो: जगातील सर्वात प्राचीन गणराज्यांपैकी एक असलेल्या या देशात मध्ययुगीन टॉवर्स, डोंगरदऱ्या, किल्ले, जुन्या वास्तू पाहायला मिळतील. हिरवळीने नटलेला हा देश फिरण्यासाठी उत्तम आहे. (Photo Source : Wikimedia Commons)
-
सेशेल्स: सेशेल्स हा आफ्रिका खंडाच्या पूर्वेला १५०० किमी दूर हिंदी महासागरातील देश आहे. तब्बल ११५ बेट मिळून हा देश तयार झाला आहे. हा देश मादागास्करच्या ईशान्येला व केन्याच्या पूर्वेला आहे. हा आफ्रिका खंडातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे. या देशात तुम्हाला शेकडो समुद्रकिनारे पाहायला मिळतील. विश्रांतीसाठी हा आदर्श पर्याय आहे. (Photo Source : Wikimedia Commons)

“ट्रम्प यांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर…”, ट्रम्प यांचं कौतुक करण्याच्या नादात पाकिस्ताननं स्वतःचं करून घेतलं हसू