-
९ ते ५ नोकरी म्हणजे सतत ऑफिसमध्ये कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसून काम करायचे. त्यामुळे जीवनशैली अगदी बैठी होऊन जाते. त्यामुळे कामाचा ताण आणि बैठ्या जीवनशैलीमुळे व्यायाम किंवा इतर कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करणे कठीण होऊन जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
म्हणून काही जण दररोज १० हजार पावले चालण्याचे ठरवतात. परंतु, नोकरीमुळे त्यांना ध्येय साध्य करणे कठीण होऊन जाते. पण, दिवसभरात शारीरिक हालचाल करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. तर ९ ते ५ नोकरी करताना दिवसाला १० हजार पावले चालणे तुम्हालाही कठीण वाटत असेल, तर तुम्ही पुढील काही गोष्टी करू शकता… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. ब्रेक घ्या – जास्त वेळ बसून राहिल्याने तुमच्या शरीराची हालचाल खूप कमी होते. त्यामुळे तुम्ही जेव्हाही उठून उभे राहाल तेव्हा त्या संधीचा लाभ घ्या. मग ते एक ग्लास पाणी पिणे असो, पाय ताणणे असो किंवा शौचालयात जाणे असो. त्यामुळे दर तासाला तीन ते पाच मिनिटे चालणे वाढते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. कॉल किंवा मीटिंग दरम्यान चालणे – जर तुम्ही फोन कॉल किंवा व्हर्च्युअल मीटिंगमध्ये असाल, जिथे स्क्रीन-शेअरिंगची आवश्यकता नसते. तेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा कॉरिडॉरमध्ये कॉल चालू असताना फिरा. त्यामुळे तुमच्या कामावर परिणाम न होता, सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. पायऱ्यांचा वापर करा – लिफ्टऐवजी पायऱ्या वापरल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन पावलांच्या संख्येतही वाढ होते. जर तुमचे ऑफिस सहाव्या किंवा सातव्या मजल्यावर असेल, तर तुम्ही पायऱ्या चढून जाऊ शकता आणि उर्वरित वेळेसाठी लिफ्ट वापरू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. जेवणाच्या ब्रेक दरम्यान फेरफटका मारा – जेवून झाल्यानंतर डेस्कच्या इथे किंवा ऑफिसच्या खाली १० ते १५ मिनिटे चालण्यासाठी वेळ काढा. त्यामुळे आवश्यक पावले चालण्याचे लक्ष्य पूर्ण होईल. तसेच तुमचे लक्ष केंद्रित होईल आणि तुमचा मूडदेखील सुधारेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. दिवसाचा शेवट चालण्याने करा – संध्याकाळीसुद्धा १० हजार पावले पूर्ण झाली नसतील, तर रात्री जेवून झाल्यानंतर चालायला जा. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास आणि तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत मिळते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर अशा प्रकारची दिनचर्या ठेवल्याने तुमचे १० हजार पावलांचे ध्येय गाठण्यासदेखील मदत होऊ शकते… (फोटो सौजन्य: @Freepik)

“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान