-
For Better Digestion Use These Ayurvedic Hacks: दिवसभर कोमट पाणी (Warm Water) हळूहळू पीत रहा. थंड पाणी पिणे टाळा, कारण ते पचनक्रिया मंद करते. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
गरम पाणी (Hot Water) शरीरातील विषारी घटक बाहेर काढायला मदत करते.
-
जेवण करण्यापूर्वी आल्याचा (Ginger) एक छोटा तुकडा, त्यावर चिमूटभर सैंधव मीठ (Rock Salt) लावून चावा. यामुळे पचनशक्ती वाढते.
-
रोज ताजे, गरम आणि नुकतेच शिजवलेले अन्न खा.
-
शिळे किंवा फ्रीजमधील थंड अन्न खाणे टाळा. गरम अन्न पचनासाठी सोपे असते.
-
रात्रीचे जेवण हलके ठेवा आणि झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी जेवण करा.
-
जेवण झाल्यावर लगेच झोपल्यास पचन नीट होत नाही.
-
जेवण झाल्यावर लगेच बसू नका किंवा झोपू नका. १०-१५ मिनिटे हळू हळू फेरफटका मारा (Short Walk).

हार्ट अटॅक येणार असेल तर तोंडामध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे; अजिबात दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या