-
चटकदार, चटपटीत पाणीपुरी खायला कोणाला आवडत नाही? लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना पाणी पुरी खायला आवडते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अनेकांसमोर नुसतं पाणीपुरी म्हटलं तरी पटकन त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. अशी ही पाणी पुरी खाणं आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे का? (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पाणीपुरी खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते आणि अॅसिडिटीदेखील कमी होते असे म्हटले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पाणीपुरीमुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात आणि वजनही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पाणीपुरी मधील पांढरा वाटाणा, हरभरा, मूग डाळ यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शिवाय पाणीपुरीच्या गोड आणि तिखट पाण्यामध्ये पुदीना, हिरवी मिरची, कोथिंबीर, चिंच, खजूर वापरा जातो. हे देखील आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पाणीपुरी मधील गोड चटणीचे सेवन निरोगी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे कारण, यामध्ये व्हिटॅमिन-सी चे प्रमाण जास्त असते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पाणीपुरीला अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही मैद्याच्या पुरीऐवजी, गव्हाची पुरी येअर फ्राय करून वापरू शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, पाणीपुरी आपल्या आरोग्यासाठी कितीही पौष्टिक असली तरीही दररोज तिचे सेवन करणे योग्य नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणापुरी खाऊ शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट