-
आपल्या घरात सुगंध पसरवण्यासाठी अनेक जण सुगंधी मेणबत्त्या वापरतात; पण या आकर्षक मेणबत्त्यांमागे दडलेला आरोग्याचा धोका डॉक्टरांनी उघड केला आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
प्लास्टिक चॉपिंग बोर्ड आणि स्क्रॅच झालेल्या नॉन-स्टिक भांड्यांइतक्याच हानिकारक सुगंधी मेणबत्त्या असतात, असा इशारा त्यांनी दिला. या मेणबत्त्यांमुळे हळूहळू आपल्या शरीरात विषारी रसायनं साचू शकतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
डॉ. राशी अगरवाल, (कन्सल्टंट, एंडोक्रायनॉलॉजी, कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई) यांच्या मते, या मेणबत्त्यांमध्ये फ्थॅलेट्स नावाचे रसायन असते, जे एंडोक्राइन डिसरप्टिंग केमिकल्स (EDCs) या गटात मोडते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
हे रसायन शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सच्या कार्यात अडथळा आणते. काही वेळा ते हार्मोन्ससारखे वागतात, तर काही वेळा त्यांच्या नैसर्गिक निर्मितीवरच परिणाम करतात. त्यामुळे हार्मोनल असंतुलन, प्रजननाचे त्रास आणि मेटाबॉलिक समस्या निर्माण होऊ शकतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
गर्भवती महिलांसाठी हा धोका अधिक गंभीर ठरतो. फ्थॅलेट्सच्या संपर्कामुळे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, प्रीक्लॅम्पसिया आणि काही वेळा स्टिलबर्थसारखे गंभीर परिणाम दिसून येतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
मुलींमध्ये या रसायनांच्या संपर्कामुळे अकाली पाळी (precocious puberty) येण्याचा धोका वाढतो. मग अशा मुलांमध्ये पुढील आयुष्यात हार्मोनल असंतुलनाची शक्यता अधिक असते, असे डॉ. अगरवाल यांनी स्पष्ट केले. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
संशोधनानुसार, फ्थॅलेट्समुळे इन्सुलिन रेग्युलेशनमध्ये बिघाड होऊ शकतो, ज्यामुळे मधुमेह, वजनवाढ व मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
स्त्री-पुरुष दोघांमध्येही हे रसायन वंध्यत्वाशी संबंधित समस्या निर्माण करू शकते. पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी होणे, तर महिलांमध्ये ओव्हम (अंडाणू) खराब होणे, असे परिणाम दिसून येतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सुगंधी मेणबत्त्यांऐवजी नैसर्गिक पर्यायांचा अवलंब करा; जसे की, बीजवॅक्स किंवा सोया वॅक्स मेणबत्त्या, शुद्ध एसेंशियल ऑईल डिफ्युजर्स. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?