-
जागतिक स्तरावर मधुमेहाचा वेगाने वाढणारा धोका जगभरात मधुमेह हा आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. सध्या २० ते ७९ वयोगटातील सुमारे ५३७ दशलक्ष प्रौढांना मधुमेह आहे म्हणजेच जगातील सुमारे १०.५ टक्के लोकसंख्या या आजाराने प्रभावित आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत हा आकडा ६४३ दशलक्षांवर आणि २०४५ पर्यंत तब्बल ७८३ दशलक्षांवर जाईल. लोकसंख्या केवळ २०% वाढणार असताना, मधुमेह रुग्णांची संख्या तब्बल ४६% ने वाढेल, असे NCBI च्या आकडेवारीत नमूद केले गेले आहे.

पाकिस्तान : जगातील सर्वाधिक मधुमेहग्रस्त देश पाकिस्तान सध्या जगातील सर्वाधिक मधुमेहग्रस्त देश ठरला आहे. सुमारे ३०.८% प्रौढ लोकसंख्या म्हणजेच जवळपास ३३ दशलक्ष लोक या आजाराने त्रस्त आहेत. २०४५ पर्यंत हा दर ३३.६% पर्यंत जाईल, असा अंदाज आहे. झपाट्याने वाढणारे शहरीकरण, बदलती आहारपद्धती व निष्क्रिय जीवनशैली या परिस्थितीला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरल्या आहेत.
-
फ्रेंच पॉलिनेशिया : प्रक्रियायुक्त अन्नामुळे वाढलेले प्रमाण फ्रेंच पॉलिनेशियामध्ये २५.२% प्रौढ लोकसंख्या सध्या मधुमेहाने ग्रस्त आहे. २०४५ पर्यंत हे प्रमाण २८.२% पर्यंत वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रक्रियायुक्त अन्नाचे जास्त प्रमाणात सेवन आणि मर्यादित शारीरिक हालचाल यांमुळे हा बेटदेश मधुमेहाच्या धोक्याच्या विळख्यात सापडला आहे.
-
कुवैत : स्थूलपणा आणि निष्क्रिय जीवनशैलीचा परिणाम कुवैतमध्ये सध्या २४.९% प्रौढांना मधुमेह आहे. २०४५ पर्यंत हा आकडा जवळपास ३०% पर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. जास्त कॅलरीयुक्त अन्न, स्थूलपणा व बसून राहण्याची सवय ही मोठी कारणे आहेत. सरकारकडून जनजागृती कार्यक्रम राबवले जात असले तरीही आव्हाने कायम आहेत.
-
नाउरू : पारंपरिक आहारापासून बदललेली जीवनशैली प्रशांत महासागरातील लहानसा देश नाउरू येथे २३.४% प्रौढ मधुमेहग्रस्त आहेत. २०४५ पर्यंत हे प्रमाण २७% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पारंपरिक आहार पद्धतीपासून दूर जाऊन साखरयुक्त आणि प्रक्रियायुक्त अन्नाचे वाढलेले सेवन, तसेच कमी शारीरिक हालचाल यांमुळे हा आजार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
-
न्यू कॅलेडोनिया (फ्रान्स) : प्रशांत बेटांवरील वाढते आरोग्य आव्हान न्यू कॅलेडोनियामध्ये सुमारे २३.४% प्रौढ लोकसंख्या मधुमेहग्रस्त आहे. २०४५ पर्यंत हा दर २६.८% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. प्रशांत बेटांमध्ये दिसणाऱ्या आहारातील बदल, प्रक्रियायुक्त अन्नाचे वाढते सेवन व घटलेली शारीरिक हालचाल ही या वाढीमागील मुख्य कारणे मानली जात आहेत.

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”