-
छोटी पोळी म्हणजे सुमारे ७० कॅलरी म्हणून जर दुपारच्या जेवणात तुम्ही दोन पोळ्या खाल्ल्या, तर १४० कॅलरी इतका भाग तुम्ही घेतला असेल. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
वजन कमी करायचं असल्यास दिवसात चार पोळ्या पुरेशा. आहारतज्ज्ञांच्या मते चार पोळ्या म्हणजे आदर्श प्रमाण, त्यापेक्षा जास्त खाल्ल्यास कॅलरी वाढू शकतात. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
फक्त पोळी कमी केल्याने वजन कमी होत नाही. झोप, व्यायाम आणि इतर अन्नपदार्थांचं संतुलन तितकंच महत्त्वाचं असतं. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
पोळी म्हणजे फक्त कार्बोहायड्रेट नव्हे; गव्हात फायबर, प्रोटीन, लोह, मॅग्नेशियमसारखे पोषक घटकही असतात, जे शरीरासाठी उपयुक्त आहेत. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
गव्हाच्या पोळीऐवजी ज्वारी, बाजरी किंवा रागीची भाकरी खाऊन बघा; अशा धान्यांमुळे पोट भरते, पण कॅलरी कमी मिळतात. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
दिवसाचे कॅलरी बजेट ठरवा आणि त्यानुसार पोळ्यांचे प्रमाण ठरवा. जास्त मेहनत घेत असाल तर एक पोळी जास्त घेणंही चालतं. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
तज्ज्ञ सुचवतात की, प्रत्येक जेवणात दोन पोळ्या पुरेशा; दुपारी व संध्याकाळी दिवसात ४ पोळ्या हे संतुलित प्रमाण मानले जाते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
लोकांच्या सवयी वेगळ्या असतात. काही जण तीन पोळ्या खातात, तर काही जण भाज्यांसोबत फक्त एकच पोळी घेतात; हे तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून असतं. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
“पोळी खाल्ल्याने वजन वाढतं” हे पूर्णपणे खरं नाही. पोळीबरोबर तेलकट भाजी किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ले तरच वजन वाढतं; पोळी स्वतः दोषी नाही. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

सरन्यायाधीश गवईंकडून आता धार्मिक परंपरांवर भाष्य! म्हणाले, सणाच्या आनंदापेक्षा…