-
तुम्हीही किती छान, महागडे कपडे घालून तयार व्हा. तुमची हेअर स्टाईल केल्यानंतरच तुम्हाला परफेक्ट लुक येतो. त्यामुळे यासाठी प्रत्येक जण हेअर स्ट्रेटनर, केस कुरळे दिसण्यासाठी कर्ल्स क्रीम केसांना लावतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, अनेकदा आपले केसही काही न लावता नैसर्गिक दिसावेत, लांब, जाड आणि मजबूत असावेत असे अनेकांना वाटते. यासाठी बरेच लोक नारळाचे तेल केसांना लावतात. तर काही जण नारळाच्या तेलात कापूर मिसळतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, असे म्हणतात की, नारळाच्या तेलात कापूर लावल्याने अनेक फायदे होतात. केस मुळांपासून मजबूत तर होतात तर कोंडा आणि खाज येण्यापासूनही संरक्षण होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कापूरमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल गुणधर्म असतात; जे टाळूवर बॅक्टेरिया, बुरशीजन्य संसर्ग जमा होण्यापासून रोखण्यास मदत करतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
कोंडा दूर होतो – कापूरचे अँटीफंगल गुणधर्म टाळूवरील बुरशी कमी करण्यास मदत तर केसांमधील कोरडेपणा सुद्धा कमी होतो. यामुळे टाळू मऊ, मॉइश्चराइज्ड राहतो. म्हणून, जर तुम्हालाही कोंडा असेल तर तुम्ही कापूर मिसळलेल्या नारळाच्या तेलाने तुमच्या टाळूची मालिश करू शकता.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
केसांची वाढ होण्यास मदत – कापूर आणि नारळाच्या तेलाने मालिश केल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण सुधारल्याने केसांना आवश्यक पोषक तत्वे मिळतात; ज्यामुळे केसांची वाढ होते आणि केस गळणे कमी होतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
उवांपासून सुटका – जर मुलांच्या केसांमध्ये उवा असतील तर नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने खूप फायदा होऊ शकतो. कापूरचा तिखट सुगंध आणि थंडावा उवा मारण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
याव्यतिरिक्त, नारळाचे तेल आणि कापूर यांचे मिश्रण ऑरिक ऍसिडचे प्रमाण वाढवते; जे केसांमधील उवा काढून टाकण्यास प्रभावी उपाय ठरतो.(फोटो सौजन्य: @Freepik)

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका