-
आपल्या शरीरात पाणी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. पाणी शरीरातील पोषक तत्त्व शोषून घेतं, पचन सुधारतं आणि प्रत्येक अवयवाला योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करतं. पण काही अन्नपदार्थांसोबत पाणी पिणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. चला जाणून घेऊ या कोणत्या पदार्थांनंतर लगेच पाणी पिऊ नये.
-
टरबूज पाण्याने भरलेला फळराजा; पण… टरबgजात तब्बल ९६ टक्के पाणी असतं. त्यामुळे हे फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनाशी संबंधित त्रास उद्भवू शकतो. टरबूज खाल्ल्यानंतर किमान ४० ते ५० मिनिटांपर्यंत पाणी टाळणं फायदेशीर ठरतं.
-
केळी पौष्टिक; पण लगेच पाणी नको! केळं हे पोटॅशियम, फायबर आणि नैसर्गिक साखर यांचं उत्तम स्रोत आहे. पण, ते खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी प्यायल्यास उलट्या, अपचन आणि पोटफुगीचा त्रास होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे केळं खाल्ल्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंच पाणी प्यावं.
-
आंबट फळं व्हिटॅमिन C ने भरपूर; पण काळजी घ्या! संत्रं, लिंबू, द्राक्ष यांसारखी आंबट फळं पोटातील आम्ल वाढवतात, ज्यामुळे पोषक तत्त्वांचं योग्य शोषण होतं. पण, ही फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास आम्ल पातळ होतं आणि त्यामुळे गॅस, पोट फुगणं आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. आंबट फळं खाल्ल्यानंतर ३० मिनिटांनीच पाणी प्यावं.
-
शेंगदाणे प्रोटीनयुक्त; पण पाणी लगेच नको! शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन आणि चांगले फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. ते शरीराचं तापमान वाढवतात आणि मेटाबॉलिझम सुधारतात. पण, शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचन मंदावू शकतं. त्यामुळे २० ते ३० मिनिटांनीच पाणी प्यावं.
-
दूध पौष्टिक; पण पाण्याबरोबर नाही! दूध म्हणजे कॅल्शियम, प्रोटीन आणि जीवनसत्त्वांचा खजिना. पण, दूध घेतल्यावर लगेच पाणी प्यायल्यास पोटातील आम्ल आणि एंझाइम्स पतळ होतात. त्यामुळे पचनावर परिणाम होऊन, पोट बिघडू शकतं. दूध घेतल्यावर काही वेळ पाणी टाळणं उत्तम.
-
पाणी आपल्या शरीरासाठी अमृतासारखं असलं तरी त्याचं आपण कशासोबत सेवन करतोय हे पाहणंही अत्यावश्यक आहे. कारण- काही फळं आणि पदार्थांनंतर लगेच पाणी प्यायल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
VIDEO : “क्या माल लग रही है”, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या पत्नीची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार, ‘त्या’ मारहाण प्रकरणाला नवं वळण