-
लघवीतून रक्त – दुर्लक्ष नको! लघवीतून रक्त येणे (Haematuria) हे किरकोळ जंतुसंसर्गापासून ते मूत्रपिंडाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापर्यंत कशाचेही लक्षण असू शकते. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, लघवीमध्ये रक्त दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटणे महत्त्वाचे आहे. हा अनेकदा कर्करोगाचा पहिला आणि महत्त्वाचा संकेत असू शकतो.
-
लघवीतील रक्ताचे प्रकार लघवीतील रक्त दृश्य आणि अदृश्य अशा दोन प्रकारचे असते. जर लघवी गुलाबी, लाल किंवा कोलाच्या रंगाची दिसत असेल, तर तो ‘दृश्य रक्तस्राव’ (Gross Haematuria) असतो. त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. ‘सूक्ष्म रक्तस्राव’ (Microscopic Haematuria) केवळ तपासणीत दिसतो. पण, तेदेखील मूत्रपिंडाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेचे लक्षण असू शकते.
-
मूत्रपिंडातील गाठीशी संबंध मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा संबंध मूत्रपिंडातील गाठी (Tumour)शी असतो. ही गाठ मोठी झाल्यावर आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांना इजा करते, ज्यामुळे रक्त लघवीत मिसळते. अनेकदा मूत्रपिंडाच्या कर्करोगामध्ये सुरुवातीला इतर कोणतीही लक्षणे नसतात. त्यामुळे लघवीतून रक्त येणे हे त्वरित तपासणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे ‘धोक्याचे चिन्ह’ ठरते.
-
लघवीतून रक्त येण्याची इतर कारणे लघवीतून रक्त येण्याची अनेक सामान्य कारणे आहेत. जसे की, मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI), मूत्रपिंडा किंवा मूत्राशयातील खडे. पुरुषांमध्ये वाढलेली पुरुषस्थ ग्रंथी हेदेखील एक कारण असू शकते. खूप कठीण व्यायाम केल्यानेही तात्पुरता रक्तस्राव होऊ शकतो.
-
लघवीतील रक्तासोबत इतर लक्षणे मूत्रपिंडाच्या कर्करोगाची शक्यता वाढवणारी लघवीतील रक्तासोबत आढळणारी लक्षणे : मूत्रपिंडाच्या बाजूला किंवा पाठीच्या खालच्या भागात सतत वेदना होणे, अचानक वजन कमी होणे,मोठ्या प्रमाणात थकवा किंवा भूक न लागणे, मूत्रपिंडाजवळ गाठ किंवा सूज जाणवणे, वारंवार येणारा आणि लवकर न जाणारा ताप.
-
कारणीभूत असणारे इतर घटक मूत्रपिंडाच्या कर्करोगाला काही घटकही कारणीभूत ठरू शकतात. त्यामध्ये धूम्रपान करणे, ५० वर्षांवरील वय, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि कुटुंबात कर्करोगाचा इतिहास यांचा समावेश होतो. रासायनिक पदार्थांच्या संपर्कात येणाऱ्यांनाही हा धोका असतो.
-
‘लघवी चाचणी’ (Urine Test) करतात. गाठ, खडे किंवा इतर समस्या तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन (CT Scan) किंवा एमआरआय (MRI)सारख्या इमेजिंग स्कॅनची मदत घेतली जाते.
-
महत्त्वाचा सल्ला : लघवीतून रक्त येणे थांबले असले तरी त्यामुळे सर्व काही ठीक झाले, असे समजू नका. रक्तस्रावाचा एकच भाग असला तरी त्याची पूर्ण तपासणी करणे गरजेचे आहे. लवकर निदान झाल्यास, कोणत्याही आजारावर वेळीच उपचार करणे सोपे होते.
-
काळजी घ्या अन् सुरक्षित राहा. घाबरून जाऊ नका; पण सावधगिरी बाळगा. लघवीतील रक्त जाणे हा शरीराकडून दिला जाणारा सावधगिरीचा एक महत्त्वाचा इशारा आहे. मूत्रपिंडाचा कर्करोग किंवा इतर कोणतेही गंभीर कारण असले तरी डॉक्टरांचा वेळेवर घेतलेला सल्ला आणि योग्य तपासणी यांमुळे तुमचा जीव वाचू शकतो. (सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)

IND vs AUS: “अरे तू करून बघ, मला नको बोलू…”, श्रेयस अय्यर भर मैदानात रोहित शर्मावर वैतागला; नेमकं काय घडलं? VIDEO