-
दिवसाची धावपळ आणि ताणतणावानंतरचा उपाय दिवसभराची धावपळ, थकवा व मानसिक ताणानंतर जर तुम्हाला गाढ झोप आणि मन:शांती हवी असेल, तर रात्री पायांवर तेलाने केलेले हे साधे आयुर्वेदिक मालिश तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. ही केवळ शरीराला आराम देणारी क्रिया नसून शरीर, मन व आत्मा या तिन्हींचे संतुलन साधणारा उपाय आहे. आयुर्वेदात याला ‘पादाभ्यंग’, असे म्हटले जाते म्हणजेच पायांना तेलाने मालिश करणे.
-
आयुर्वेदानुसार पायांच्या मालिशचे महत्त्व आयुर्वेद सांगतो की, आपल्या पायांमध्ये अनेक महत्त्वाच्या नसा आणि बिंदूंचा समूह असतो, जे थेट संपूर्ण शरीराशी जोडलेले असतात. जेव्हा आपण पायांवर हलक्या हातांनी तेल लावून मालिश करतो, तेव्हा रक्तसंचार सुधारतो आणि शरीरातील वात, पित्त, कफ हे दोष संतुलित होतात.
-
दीर्घायुष्य आणि मानसिक शांततेचा मार्ग रात्री पायांना मालिश केल्याने शरीर निरोगी राहते, आयुष्य वाढते आणि मनाला शांतता मिळते. म्हणूनच प्राचीन काळात पादाभ्यंग हा ‘दैनिक दिनक्रमाचा’ अत्यावश्यक भाग मानला जात होता.
-
गाढ आणि समाधानकारक झोप मिळते पायांना मालिश केल्याने नसांमधील ताण कमी होतो आणि मन शांत होते. त्यामुळे झोप लवकर लागते आणि ती अधिक गाढ होते.
-
मानसिक ताण व थकवा दूर होतो तेलाने मालिश केल्यामुळे शरीरावर आलेला ताण आणि थकवा हळूहळू नाहीसा होतो. मग मन प्रसन्न होते
-
रक्तसंचार सुधारतो आणि ऊर्जा वाढते पायांच्या मांसपेशींवर मालिश करताना उष्णता निर्माण होते, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. शरीरात ऊर्जा संचारते आणि थंडी व अंगदुखीपासूनही आराम मिळतो.
-
त्वचा होते मऊ आणि निरोगी पायांच्या त्वचेला पोषण आणि ओलावा मिळतो, ज्यामुळे फाटलेल्या टाचा आणि कोरडेपणा दूर होतो. त्वचा अधिक मऊ, कोमल व निरोगी दिसते.
-
तिळाचे तेल वातदोष कमी करण्यासाठी तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. हे तेल नसांना बळकट करते, सांध्यातील जडपणा कमी करते आणि झोप लागण्यास मदत करते.
-
नारळाचे तेल नारळाचे तेल पित्तदोष संतुलित करते आणि पायांना थंडावा व ओलावा प्रदान करते. सूज, जळजळ किंवा उष्णतेच्या त्रासात हे विशेषतः उपयुक्त आहे.
-
तूप तूप हे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि मानसिक शांतता वाढवते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी तूप फायदेशीर आहे. ते त्वचेला कोमलता आणि मेंदूला पोषण देते.
-
मालिश करण्याची योग्य पद्धत झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्याने धुऊन कोरडे करा. आपल्या प्रकृतीनुसार योग्य तेल निवडा आणि ते थोडेसे कोमट करून वापरा. टाच, तळवे आणि बोटांभोवती हलक्या हातांनी ५–१० मिनिटे गोलाकार हालचालींत मालिश करा. त्यानंतर १०–१५ मिनिटे थांबा, जेणेकरून तेल त्वचेत शोषले जाईल. इच्छित असल्यास हलके सुती मोजे घालून झोपा, जेणेकरून तेल कपड्यांना लागणार नाही.
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक