-
किडनी (मूत्रपिंड) आरोग्यासाठी ६ सोप्या टिप्स! तुमची मूत्रपिंडे तुमच्या शरीरासाठी २४ तास शुद्धीकरणाचे काम करत असतात. त्यांचे आरोग्य जपण्यासाठी आताच ‘या’ सोप्या सवयी लावून घ्या आणि भविष्यातील जीवघेणे नुकसान टाळा. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
पुरेसे पाणी प्या हाइड्रेटेड राहा : पुरेसे पाणी प्यायल्यास मूत्रपिंडांना विषारी पदार्थ (Toxins) बाहेर टाकण्यास मदत होते. पाण्याची कमतरता (Dehydration) मूत्रपिंडांचे कार्य कमी करते. म्हणून दिवसभर अधूनमधून पाणी पीत राहा. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
रक्तदाब आणि रक्तशर्करा नियंत्रणात ठेवा दुहेरी धोका टाळा : उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेह ही मूत्रपिंडे खराब होण्याची प्रमुख कारणे आहेत. नियमित तपासणी करून या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
सक्रिय राहा आणि वजन सांभाळा मूत्रपिंडांवरील ताण कमी करा : लठ्ठपणा आणि शारीरिक निष्क्रियता मूत्रपिंडांवरील ताण वाढवते. नियमित व्यायाम आणि योग्य प्रमाणात वजन राखल्याने मूत्रपिंडांचे कार्य सुधारते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
मूत्रपिंडस्नेही)??? आहार घ्या आहारातून मदत : जास्त फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य खा. तसेच मीठ (Sodium), प्रक्रिया केलेले पदार्थ आणि अतिरिक्त प्रथिने कमी करा. त्यामुळे मूत्रपिंडांना आराम मिळतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
वेदनाशामक औषधे आणि धूम्रपान टाळा धोक्यापासून दूर राहा: ओव्हर-द-काउंटर वेदनानाशक गोळ्यांचा अतिवापर आणि धूम्रपान यांमुळे मूत्रपिंडांना होणाऱ्या रक्तपुरवठ्याचे प्रमाण कमी होते आणि नुकसान वाढवते. त्यामुळे औषधे जपून वापरा आणि धूम्रपान सोडा. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
नियमित आरोग्य तपासणी करा लवकर निदान महत्त्वाचे : मूत्रपिंडांचे होणाऱ्या नुकसानीसंदर्भातील लक्षणे सुरुवातीला दिसून येत नाहीत. त्यामुळे धोका असल्यास eGFR आणि Urine Albumin सारख्या तपासण्या वेळोवेळी करून घ्या. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
डॉक्टरांचा सल्ला घ्या मार्गदर्शनाखाली काम करा : विशेषतः जर तुम्हाला मूत्रपिंडांच्या समस्यांचा धोका असेल, तर नियमितपणे डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्या. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक