-
सर्वोत्तम आणि संपूर्ण आहार- आईचं दूध हे नवजात बाळासाठी सर्वांत परिपूर्ण अन्न आहे. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे व आरोग्यदायी चरबी यांचे योग्य संतुलन असते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
जन्मानंतर लगेच स्तनपान- बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या तासातच स्तनपान सुरू करणे महत्त्वाचे आहे. ते आईसाठी रक्तस्राव कमी करते आणि बाळासाठी पोषण सुरू करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
‘कोलोस्ट्रम’ हे पहिले संरक्षण- जन्माचे पहिले दूध म्हणजे ‘कोलोस्ट्रम’. हे घट्ट पिवळे दूध अँटिबॉडीजने समृद्ध असते, जे बाळाला संसर्गापासून वाचवणारे पहिले संरक्षण कवच आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
बाळाचं नैसर्गिक लसीकरण- आईच्या दुधातील अँटिबॉडीज बाळाची प्रतिकारशक्ती वाढवतात. हे बाळासाठी नैसर्गिक लसीकरणाचे काम करते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पाण्याची गरज नाही- आईच्या दुधात सुमारे ९०% पाणी असते. त्यामुळे बाळाला सहा महिन्यांपर्यंत स्वतंत्रपणे पाणी देण्याची गरज नसते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
आईच्या आरोग्यासाठी फायदे- स्तनपानामुळे आईचे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच तिला स्तन आणि अंडाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
मेंदूच्या विकासाला मदत- दुधात असलेले डीएचए (DHA)सारखे विशेष फॅटी अॅसिड बाळाच्या मेंदू आणि दृष्टीच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
सहा महिने फक्त आईचं दूध जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), बाळाला सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचं दूध द्यावं. दुसरे कोणतेही अन्न किंवा पेय देऊ नये. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पोषण आणि प्रेमाचा स्पर्श- स्तनपान केवळ पोषण नाही, तर आई आणि बाळामधील प्रेम, जिव्हाळा व भावनिक नातं अधिक घट्ट करणारी प्रक्रिया आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…