-    आपल्या घरात सहज उपलब्ध, अत्यंत कमी किमतीची आणि अगदी निवडक गोष्टींसाठी वापरली जाणारी एकमेव वस्तू म्हणजे ‘तुरटी’. अनेकदा तुरटी केवळ पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरली जाते. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    पण, प्रत्यक्षात तिच्या औषधी गुणधर्मांबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुरटीचे रासायनिक नाव “पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट” असे आहे. तुरटी खरोखरच जादुई आहे. अंगावर एखादी जखम असेल किंवा तुमचे बोट कापले असेल तर तुरटी अँटीसेप्टिक म्हणून काम होते; ज्यामुळे त्या भागाचे निर्जंतुकीकरण होऊन जाते.(फोटो सौजन्य: @Freepik) 
-    तरुण मंडळींना अनेकदा मुरुमांमुळे त्रास होतो. जेव्हा मुरुम बरे होत नाहीत तेव्हा अनेक जण क्रीमचा वापर करतात. पण, त्याऐवजी तुरटी वापरल्याने मुरुमे दूर होतात आणि त्याचा रंगही उजळतो.(फोटो सौजन्य: @Freepik) 
-    चेहऱ्यावरील डाग – चेहऱ्यावर तुरटीच्या पाण्याचा वापर केल्याने डाग दूर होण्यास आणि त्वचा उजळण्यास मदत होते. कोणत्याही क्रीमपेक्षा तुरटी वापरणे खूपच सोपे आहे. खूअगदी थोडीशी तुरटी घ्या आणि ती एका मगमध्ये ठेवा. तुरटी पाण्यात विरघळली की, पाण्याने तुमचा चेहरा धुवून घ्या.(फोटो सौजन्य: @Freepik) 
-    आंघोळीच्या पाण्यात तुरटी घाला – आंघोळीच्या पाण्यात तुरटी घातल्याने त्वचा घट्ट होते. तुरटी आणि गुलाबपाणी मिक्स करून आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही या पाण्याने त्वचा धुवू शकता. यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस कमी होण्यास देखील मदत होते. गुलाबपाण्यात एक चमचा तुरटी पावडर मिसळून पेस्ट बनवा आणि जिथे अनावश्यक केस आले आहेत तिथे ही पेस्ट लावा; काही दिवसांतच तुम्हाला परिणाम दिसून येतील.(फोटो सौजन्य: @Freepik) 
-    तोंडाची दुर्गंधी दूर करते – तुरटी माउथवॉशपेक्षा मस्त उपाय आहे. तुतरती केवळ तोंडाची दुर्गंधी दूर करत नाही तर तोंडातील बॅक्टेरिया नियंत्रित करण्यास मदत करते. कोमट पाण्यात तुरटीचा एक छोटा तुकडा भिजवून ठेवा. यामुळे केवळ दातांवरील प्लाक काढून टाकत नाही तर लाळेतील बॅक्टेरिया देखील मारण्यास मदत करते. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होऊन जाते.(फोटो सौजन्य: @Freepik) 
-    दातदुखी – तुरटीच्या या पाण्याने गुळण्या केल्याने घसा खवखवणे कमी होईल आणि दातदुखीपासूनही आराम मिळू शकतो.फक्त तुरटीचे पाणी घशातून खाली जाऊ नये याची काळजी घ्या.(फोटो सौजन्य: @Freepik) 
-    जखमेवर उपचार – अनेकदा दुखापत होते, त्वचेवर ओरखडे येतात किंवा बोट कापलं जातं तेव्हा अँटीसेप्टिक नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण – यामुळे जखम, किरकोळ दुखापती, जखम कमी होते. फक्त कोमट पाण्यात तुरटी घाला आणि कापसाने लावा.(फोटो सौजन्य: @Freepik) 
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  